Nandurbar News : नवापूर महामार्गाजवळ वाहनांचा चक्काजाम

Nawapur: Queues of vehicles on the highway due to traffic jam
Nawapur: Queues of vehicles on the highway due to traffic jamesakal

नवापूर : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाचे चौपदरीकरण करण्याचे काम संथ गतीने होत असल्याने प्रवाशांची डोकेदुखी वाढली आहे. नवापूरचे कोठडा व चिंचपाडा रेल्वे फाटक जवळ खूप वेळ वाया जातो.

या दोन्ही रेल्वे क्रॉसिंगला उड्डाणपूल लवकरात लवकर होणे गरजेचे झाले आहे. नवापूर कोठडा रेल्वे फाटकाजवळ येत्या दोन महिन्यात उड्डाणपूल तयार होईल तर चिंचपाडा रेल्वे क्रॉसिंगच्या ठिकाणी जूनपर्यंत उड्डाणपुलाचे काम होईल असे श्री. म्हात्रे यांनी सांगितले. हे उड्डाणपूल झाल्याशिवाय वाहतुकीची कोंडी सुटणार नसल्याचे चित्र आहे. (Traffic jam near Navapur highway Nandurbar News)

Nawapur: Queues of vehicles on the highway due to traffic jam
Nashik News : उंटवाडीजवळ मद्यधुंद कारचालकाची 3 वाहनांना धडक

नवापूर शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाचे चौपदरीकरण करण्याचे काम संथ गतीने होत असल्याने डोकेदुखी ठरत आहे. रोज वाहतुकीची कोंडी होत असल्याने नवापूर व चिंचपाडा रेल्वे गेटदरम्यान प्रवाशांचे, वाहन चालकांचे खूपच मोठ्या प्रमाणात हाल होतात. दोन-दोन तास चक्काजाम लागतो.

तीन-चार किलोमीटरच्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असतात. चिंचपडा रेल्वेफाटक जवळ दोन्ही बाजूला दोन-तीन किलोमीटर पर्यंत एकेरी रस्ता असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे वाहतूक पोलिस कर्मचारी उपस्थित नसल्याने वाहतूक सुरळीत होण्यास विलंब होते. अवजड वाहन, बसेस, खासगी वाहनांना तासन्तास ताटकळत बसावे लागते. या कोंडीत कोणी ओव्हरटेक किंवा वाहन उलट दिशेने नेत असल्याच जास्तच वाहतूक कोंडी होते.

हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

Nawapur: Queues of vehicles on the highway due to traffic jam
Jalgaon Crime News : वृद्धाचे हातपाय बांधून साडेसहा लाखांची लूट

रेल्वेफाटक अर्धा तास बंद

नवापूर व चिंचपाडा रेल्वे फाटक जवळ वाहतूक कोंडीची समस्या ही नित्याची झाली आहे. नवापूर व चिंचपाडा रेल्वे क्रॉसिंगच्या ठिकाणी उड्डाणपूल लवकर तयार होणं खूपच आवश्यक आहे. नवापूर तालुक्यातील नागरिकांची नंदुरबार येथे ये-जा असते. मात्र, नवापूर आणि चिंचपाडा रेल्वेगेट मुळे नागरिकांचा खूप वेळ वाया जात असल्याचे दिसत आहे. अवजड वाहन रस्त्यावर नादुरुस्त झाल्यावर वाहनांच्या रांगा लागतात. वाहतूक सुरळीत होत नाही तोपर्यंत रेल्वे फाटक बंद होते. रेल्वेफाटक किमान पंधरा मिनिटे ते अर्धा…

Nawapur: Queues of vehicles on the highway due to traffic jam
Aurangabad News: जिल्ह्यात थर्टी फर्स्टसाठी परमीट एकदिवसीय मद्यप्राशनासाठी ८० हजार परवाने

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com