Latest Marathi News | वृद्धाचे हातपाय बांधून साडेसहा लाखांची लूट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

Jalgaon Crime News : वृद्धाचे हातपाय बांधून साडेसहा लाखांची लूट

पाचोरा : दुसखेडा (ता.पाचोरा) येथे भरदिवसा दुपारी दोनच्या सुमारास घरात एकटेच असलेल्या ८७ वर्षीय वृद्धास चाकूचा धाक दाखवत, हातपाय बांधून कपाटातील पाच लाख रुपयांची रोकड व तीस ग्रॅम सोन्याचे दागिने असा एकूण सहा लाख ५० हजार रुपयांचा ऐवज चोरट्याने लंपास केला. यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी श्वानपथक आणून चोरट्याचा माग काढण्याचा प्रयत्न केला आहे. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल नव्हता. दुसखेडा येथे एकनाथ पांडू पाटील हे आपल्या परिवारासह वास्तव्यास आहेत. गुरुवारी (ता. २९) दुपारी दीडच्या सुमारास त्यांचा मुलगा शेतात व घरातील महिला गल्लीतील एका महिलेकडे पापड तयार करण्यासाठी गेले. (By tying hands and feet of old man thief worth six and a half lakhs jalgaon crime news)

हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

हेही वाचा: SAKAL Impact News : उद्यान दुरूस्तीच्या हालचालींना वेग; समस्या सोडविण्यास सुरवात

त्यामुळे एकनाथ पाटील हे वृद्ध घरात एकटेच पलंगावर झोपून होते. दुपारी दोनच्या सुमारास तोंडाला रुमाल बांधलेला व हातमोजे घातलेला युवक घरात घुसला. त्याने एकनाथ पाटील यांना चाकूचा धाक दाखवत पलंगावरून उठवले व त्यांच्या तोंडाला रुमाल बांधून मागच्या खोलीत नेले.

तेथे हातपाय बांधून बाजूला ढकलून दिले व घरातील गोदरेजच्या कपाटातील पाच लाख रुपयांची रोकड व ३० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा सहा लाख ५० हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला. ही घटना ग्रामस्थांना कळताच ग्रामस्थ भयभीत झाले. पोलिसांनी त्वरित घटनास्थळाला भेट दिली असून, श्वानपथक पाचवरण केले.

या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तपासचक्र गतिमान केले आहेत. दरम्यान, एकनाथ पाटील यांच्याकडे नातवाचा लग्न सोहळा असल्याने त्यांनी लग्नसोहळ्यासाठी घरात रोकड व दागिने ठेवले होते. याची माहिती असणाऱ्यांनीच ही लूट केली असावी, असा अंदाज व्यक्त होत आहे.

हेही वाचा: Nashik crime News : त्यांना तत्काळ अटक करा, अन्यथा...; मयत शिंदेच्या पत्नीचा पोलीस अधीक्षकांना इशारा