Nandurbar News : रहदारीचे ठिकाण सोडून मुख्य रस्त्यावर निष्ठेने कर्तव्य; नागरिकांचा रोष!

Nandurbar News
Nandurbar News esakal

शहादा (जि.नंदुरबार) : शहरात वाहतूक (Traffic) सुरळीत राहावी यासाठी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे; परंतु मुख्य बाजारपेठेतील कर्तव्याला फारकत देत वाहतूक पोलिस

शहराबाहेरील बायपास रस्त्यांवर थांबून विविध वाहनधारकांकडून कागदपत्रांची मागणी करत आपले कर्तव्य निष्ठेने बजावतात. (Traffic police deviating from duty in main market people are angry nandurbar news)

मात्र या वेळी शहरात वाहतूक कोंडी वरून होणारे वादविवाद नित्याचेच झाले आहेत. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून मागणी होत आहे.शहादा शहरात वाहतूक कोंडी नवीन नाही.

बसस्थानक परिसर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर, गांधी पुतळा, पालिका, शाळा, महाविद्यालय परिसर, खेतिया रोड आदी ठिकाणी वाहतूक कोंडी नित्याचाच भाग झाली आहे. शहरातील वाहतूक सुरळीत असावी, सर्वसामान्य नागरिकांना वाहतूक कोंडीच्या त्रासाला सामोरे जावे लागू नये यासाठी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात येते;

परंतु संबंधित वाहतूक पोलिस आपले कर्तव्य निष्ठेने बजावण्यासाठी शहरातील बायपास रस्त्यावरील भाऊ तात्या पेट्रोलपंप, संविधान चौक, प्रकाशा रस्ता आदी ठिकाणी हजर असतात.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

Nandurbar News
Nandurbar News :शिक्षण विभागात पाणी मुरते कुठे? पदोन्नती, दिव्यांग बोगस प्रमाणपत्राचा विषय गाजला

मुख्य बायपास रस्त्यांवरून ये-जा करणाऱ्या वाहनांना अडवत विविध कागदपत्रांची मागणी केली जाते. या वेळी कागदपत्र जवळ असो वा नसो वाहतूक पोलिस मात्र आपले कर्तव्य निष्ठेने पार पाडतात. यात तसूभरही हयगय केली जात नसल्याचे अनेक वाहनधारक सांगतात.

डेप्युटींनाही सोडत नाही..!

दरम्यान, गुरुवारी (ता. १६) दुपारी एकच्या सुमारास भाऊ तात्या पेट्रोलपंपाजवळ वाहतूक पोलिसाने एका चारचाकी वाहनचालकाशी चांगलीच हुज्जत घातली. ‘अहो, कागदपत्र द्या, मी आमच्या डेप्युटी साहेबांनाही सोडत नाही.

त्यांच्या गाडीलाही दंड करतो तर तुम्ही कोण आलेय’ असे म्हणत कागदपत्रांची मागणी करण्यात आली. संबंधित वाहतूक पोलिसाच्या या चढ्या आवाजातील वाक्याने व सज्जड दमाने सामान्य वाहकधारक मात्र चांगलेच भयभीत झाले. निष्ठेने कर्तव्य पार पाडणाऱ्या या वाहतूक पोलिसाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेणे मात्र क्रमप्राप्त ठरते.

Nandurbar News
Nandurbar News : कार मोटारसायकलचा अपघातात 2 जण जखमी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com