Truck Bike Accident : आयशरच्या धडकेत कोचूरचे दांपत्य ठार; बाळ सुखरूप

भरधाव आयशर ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील पती-पत्नी जागीच ठार झाले. मात्र, त्यांचे एक वर्षाचे बाळ चमत्कारिकरीत्या बचावले.
Truck Bike Accident

Truck Bike Accident

sakal

Updated on

​मुक्ताईनगर - भरधाव आयशर ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील पती-पत्नी जागीच ठार झाले. मात्र, त्यांचे एक वर्षाचे बाळ चमत्कारिकरीत्या बचावले. ‘देव तारी त्याला कोण मारी’ या उक्तीचा प्रत्यय उपस्थितांना आला. हा अपघात तालुक्यातील बेलसवाडी फाटा परिसरातील मरिमाता मंदिराजवळ सोमवारी (ता. ४) सकाळी आठच्या सुमारास झाला. कोचूर ​(ता. रावेर) येथील रहिवासी गजानन हिरामण पाटील व त्यांच्या पत्नी अश्विनी एक वर्षाच्या चिमुरड्याबरोबर सकाळी दुचाकीने द्वारदर्शनासाठी निघाले होते.

मरिमाता मंदिराजवळील बेलसवाडी फाट्यावर आले असताना, समोरून येणाऱ्या भरधाव आयशर ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. धडक इतकी जोरात होती, की,गजानन पाटील व अश्विनी पाटील जागीच ठार झाल्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com