पाचोरा- प्रेम आंधळे असते, असे म्हणतात. काही प्रेमात यशस्वी होतात, तर काहींना प्रेमाच्या आणाभाका घेत आपली जीवनयात्रा संपवावी लागते. असाच काहीसा प्रकार भातखंडे येथील राजेंद्र मोरे व बारामती येथील राधिका ठाकरे यांच्यासंदर्भात झाला असून, दोघांनी परधाडे (ता. पाचोरा) रेल्वेस्थानकाजवळ चारवर्षीय सारंगसह रेल्वेखाली आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपविली.