esakal | खानदेश एक्स्‍प्रेस त्वरित सुरू करून नियमित करा 
sakal

बोलून बातमी शोधा

train

भारतातील सुप्रसिद्ध पर्यटन स्थळ स्टँच्यु आँफ युनिटी केवडीया काँलनीला नवीन सुरू केलेल्या प्रवासी गाड्यांना थांबा द्यावा.

खानदेश एक्स्‍प्रेस त्वरित सुरू करून नियमित करा 

sakal_logo
By
विजय बागल

निमगूळ : पश्र्चिम रेल्वेच्या निरीक्षणासाठी आलेले पश्र्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कंसल, विभागीय रेल्वे व्यवस्थापक सत्याकुमार व त्यांच्यासोबत प्रमुख अधिकारींचा ताफा शिंदखेडा रेल्वे स्थानकांवर आले असता त्यांना खासदार सुभाष भामरे, आमदार जयकुमार रावल यांच्यातर्फे आमदार काशीराम पावरा व रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य प्रवीण महाजन यांच्या नेतृत्वाखाली भेट घेऊन विविध समस्यांवर शिंदखेडा रेल्वे स्थानकांवर चर्चा केली. 

आवश्य वाचा- धुळे- नंदुरबार जिल्हा बँकेचा निर्णय; यंदा १२ एप्रिलपासून पीक कर्जवाटप 
 

खानदेशवासींयासाठी उपयुक्त असलेली भुसावळ-बांद्रा खानदेश एक्स्‍प्रेस कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या २४ मार्चपासून बंद करण्यात आली आहे. बहुतांश रेल्वे मार्गावरील प्रवासी रेल्वे सुरू झालेल्या आहेत त्याअनुषंगाने खानदेशवासींसाठी महत्त्वपूर्ण असलेली भुसावळ- बांद्रा खान्देश एक्स्‍प्रेस पूर्ववत सुरू करून नियमित करावी अशी आग्रही मागणी जयकुमार रावल यांनी पत्राद्वारे केली. त्याच्यांवतीने ही मागणी भाजप शहराध्यक्ष तथा पश्र्चिम रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य प्रवीण महाजन यांनी पश्र्चिम रेल्वेचे मुख्य व्यवस्थापक आलोक कंसल व विभागीय रेल्वे व्यवस्थापक जी. वी. एल. सत्याकुमार यांच्याकडे केली. 

गाडी सुटण्याच्या वेळत ही बदल करा 

खानदेश एक्सप्रेसला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद मिळाला होता. ही गाडी पूर्ववत सुरू करून नियमित करावी जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांना तसेच व्यापारी, विद्यार्थी, राजकीय व्यक्तींना लाभ होईल. गाडीची वेळ ही प्रवाशासाठी सोईची नसून मुंबईहून मध्यरात्री ११:५० ला सुटते व भुसावळला उशिरा १०.३०वा पोहचते. त्याऐवजी बांद्राहुन सदर गाडी रात्री ९ वा. सुटून सकाळी ८ वाजेपावेतो भुसावळला पोहचली पाहिजे. तसेच भुसावळहुन सायंकाळी ५.३० ला म्हणजे खूप लवकर सुटते व भल्या पहाटे ३.४५ वा.बांद्रा येथे अवेळी पोहचते. त्याऐवजी सदर गाडी रात्री ८ वाजेपावेतो सुटून सकाळी ७ वाजेपावेतो बांद्रा येथे पोहचेल जेणेकरून सर्व प्रवांशाना सुयोग्य वेळ प्राप्त होईल.

आवर्जून वाचा- महावितरणकडून लूट सुरूच; छुप्या करांमुळे दुप्पट वीजबिलाचा ‘शॉक’  ​
 

जलद गाड्या पूर्ववत सुरू करा

तसेच भारतातील सुप्रसिद्ध पर्यटन स्थळ स्टँच्यु आँफ युनिटी केवडीया काँलनीला नवीन सुरू केलेल्या प्रवासी गाड्यांना थांबा देऊन इतर सर्व नियमित जलद गाड्या पूर्ववत सुरू करून दोंडाईचा स्थानकावरील थांबे पूर्ववत करावेत असे निवेदन भाजप शहराध्यक्ष तथा पश्र्चिम रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य प्रवीण महाजन, नगरसेवक कृष्णा नगराळे, जितेंद्र गिरासे भरतरी ठाकूर संजय तावडे, याप्रसंगी आमदार काशीराम पावरा, जिल्हा परिषद सदस्य संजीवनी सिसोदे, बाळासाहेब गिरासे, सलिम नोमानी यांनी दिले.

संपादन- भूषण श्रीखंडे 
 

loading image