`स्पायडर मॅन' प्रमाणे भिंतीवर चढणाऱ्या बेडकाच झाडावर घरटं 

सर्पमित्र समाधानच्या अंगावचढताना ट्री-फ्रॉग.र
सर्पमित्र समाधानच्या अंगावचढताना ट्री-फ्रॉग.र
Updated on


जळगाव : एरवी डराव-डराव करणारे बेडूक आपल्याला पाण्यात अथवा जमिनीवर पाहायला मिळतात. मात्र, झाडावर व भिंतीवर सरासर चढणारा बेडूक कधी पाहिलांय का? अनेकांकडून "नाही' हेच उत्तर येईल. पण, असा बेडूक जळगाव शहरालगतच्या शिरसोली मार्गालगत असलेल्या जंगलात आढळून आला आहे. "कॉमन ट्री- फ्रॉग' प्रकारचे हे बेडूक असून, त्याची दोन पिले मेहरुणचे सर्पमित्र समाधान नाईक यांनी पकडली आहेत. वनसंपदा, जंगले नष्ट होत असल्याने दुर्मिळ होत चाललेल्या हे बेडूक परिसरात कुतूहलाचा विषय बनले आहेत.

मेहरुण येथील सर्पमित्र समाधान नाईक यांना भिंतीवर चढणाऱ्या बेडकाच्या पिलांना बघितल्याचा फोन आला. तत्काळ त्यांनी शिरसोली रस्त्यालगत असलेल्या राससोनी महाविद्यालयामागील परिसरात जाऊन दोन्ही पिले सावधतेने पकडून आणली. सापांप्रमाणे या बेडकाची माहिती होण्यासाठी त्यांनी ही पिले पकडल्यावर परिसरात चर्चेचा विषय बनली आहे. "कॉमन ट्री- फ्रॉग' प्रजातीची असलेली ही बेडकाची पिलं सहजगत्या पालीप्रमाणे भिंतीवर, झाडांवर चढत असल्याचे आढळून आल्याने या बेडकांना पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी होऊ लागली आहे.

साठ दिवसांत अंड्यातून बाहेर
बेडूक व बेडकांच्या बहुतांश प्रजाती पाण्यात अंडी घालतात. ती 50 ते 60 दिवसात फलित होऊन त्यांचं बेडूकमाशात रूपांतर होतं. पुढे उपलब्ध अन्न, पाण्याचं तापमान इत्यादी घटकांनुसार साधारण 50 दिवसांत बेडूकमाशांचं रूपांतर बेडूक पिलात होतं. ही बेडूकपिलं हुबेहूब मोठ्या बेडकांसारखीच दिसतात. परंतु, वृक्ष बेडूक (tree frog) आणि झुडूप बेडकांच्या (bush frog) प्रजाती मात्र अनुक्रमे झाडाच्या आणि झुडपांच्या फांद्यांवरील फेनगृहात (foam nest) किंवा जंगलातील जमिनीवर पसरलेल्या ओलसर पालापाचोळ्यात अंडी घालतात. वृक्ष बेडकांच्या बेडूकमाशांची वाढ झाडाखाली साठलेल्या डबक्‍यात होते, तर झुडूप बेडकांच्या अंड्यांतून थेट बेडूकपिलंच जन्माला येतात.

असं आहे हे बेडूक
"कॉमन ट्री फ्रॉग' बेडकाचे शरीर अगदी बारीक टोकदार शेपटीसह किंचित लेश्‍मल आहे. शरीराचा रंग राखाडी, हिरवा, पिवळा, लालसर किंवा गडद तपकिरी रंगाच्या विविध छटा अशा स्वरूपात वातावरणानुसार दिसून येतात, बहुतेकदा मागील बाजूस चार पट्टे असतात. "पॉलिपिडेट्‌स ल्युकोमाइटेक्‍सला' म्हणजे "कॉमन ट्री फ्रॉग' या प्रजातीला आययूसीएन रेडडेटा लिस्टमध्ये धोकादायक प्रजातीमध्ये स्थान नसले तरी कमी होत असलेले वने, जलाशये, कुरणे, यामुळे यांचा अधिवास नष्ट होत आहे. तसेच शेती शिवारात कीटकनाशकांच्या अति वापरामुळे भविष्यात ही प्रजाती संकटात येऊ शकसपाट, ओव्हिड असते. वरील बाजूस असलेली त्वचा गुळगुळीत चिकट श्‍ते.


"कॉमन ट्री-फ्रॉग' ही झाडावर वास्तव्य करणाऱ्या छोट्या बेडकाची प्रजाती आहे, विद्यापीठाचा परिसर, मेहरुण, मोहाडीच्या जंगलासह इतर ठिकाणी ही प्रजाती आढळून येते. धोकादायक गटातील नसला तरी, मुळात जंगलच नष्ट झाल्याने सहसा आढळून येत नाही.
- बाळकृष्ण देवरे
वन्यजीव संरक्षण संस्था
 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com