धुळे- जिल्ह्यात ‘नाफेड’मार्फत दरवर्षी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून तूर खरेदी सुरू होते. यंदा १३ फेब्रुवारीपासून खरेदी सुरू झाली. तथापि, धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत १४ फेब्रुवारीपासून शनिवार (ता. २२)पर्यंत सुमारे दोन हजार ३६९ क्विंटल लाल तुरीची आवक झाली. त्या तुलनेत कमाल चार हजार, किमान सात हजार ३२० आणि सर्वसाधारण सहा हजार ९३५ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. ‘नाफेड’मार्फत २४ जानेवारीपासून तूर खरेदीसाठी नोंदणी होत आहे. तुरीचा हमीभाव प्रतिक्विंटल सात हजार ५५० रुपये असला, तरीही उत्पादक शेतकरी आपला माल कृषी उत्पन्न बाजार समितीत नेत असल्याचे चित्र आहे. ‘नाफेड’तर्फे होणाऱ्या तूर खरेदीस शेतकऱ्यांचा अपेक्षित प्रतिसाद नसल्याची स्थिती आहे.