आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठी गणवेश 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 एप्रिल 2018

सटाणा : येथील मविप्र संचलित लोकनेते पं. ध. पाटील मराठा इंग्लिश स्कूलमधील इयता दहावीच्या विद्यार्थ्यांनी त्यांचे शालेय गणवेश विद्यालयातील आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठी मुख्याध्यापक बी. एस. देवरे व शाळा प्रशासनाकडे सुपूर्द केले. दहावीच्या विद्यार्थ्यांनी इतरांसमोर आदर्श ठेवला असून त्यांच्या या सामाजिक बांधिलकीचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

सटाणा : येथील मविप्र संचलित लोकनेते पं. ध. पाटील मराठा इंग्लिश स्कूलमधील इयता दहावीच्या विद्यार्थ्यांनी त्यांचे शालेय गणवेश विद्यालयातील आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठी मुख्याध्यापक बी. एस. देवरे व शाळा प्रशासनाकडे सुपूर्द केले. दहावीच्या विद्यार्थ्यांनी इतरांसमोर आदर्श ठेवला असून त्यांच्या या सामाजिक बांधिलकीचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

मूल्यशिक्षणाचे धडे देताना मुख्याध्यापक बी. एस. देवरे व इतर वरिष्ठ शिक्षकांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना सामाजिक कार्यात नेहमी सक्रीय राहण्याविषयी आवाहन केले होते. गेल्या महिन्यात इयत्ता दहावीची परीक्षा संपली. त्यानंतर मुख्याध्यापक व शिक्षकांच्या आवाहनास प्रतिसाद देत इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो, या उक्तीप्रमाणे आपापले शालेय गणवेश शाळेतील गोरगरीब विद्यार्थ्यांना देण्याचे ठरविले. आज गुरुवार (ता.२६) रोजी तेजस अहिरे, मनिष येवला, मयूर पानसरे, जयेश मोरे, अभय तिवारी, ललित सोनवणे, राहुल ठोके आदी विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक श्री. देवरे व उपमुख्याध्यापक ए. पी. सूर्यवंशी यांची भेट घेऊन आपापले शालेय गणवेश सुपूर्द केले. 

शालेय वर्ष संपताच अनेक विद्यार्थी आपल्या गणवेशांचा वापर न करता घरात अडगळीत टाकतात. मात्र आपले गणवेश शाळेतील आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिल्याने लोकनेते पं. ध. पाटील मराठा इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थ्यांनी इतर विद्यार्थ्यांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. 

यावेळी आर. डी. खैरनार, एस. टी. भामरे, शेखर दळवी, रामकृष्ण अहिरे, विनायक बच्छाव, क्रीडाशिक्षक सी. डी. सोनवणे, यशवंत भदाणे, डी. बी. हयाळीज, आर. जे. थोरात, एस. पी. जाधव, डी. पी. रौंदळ, ए. ए. बिरारी, एम. के. कापडणीस, एस. आर. भामरे, ए. एस. देसले, बी. टी. वाघ, आर. एस. पाटील, बच्छाव, एन. जी. जाधव, बी. ए. निकम, बी. बी. सावकार, एस. ए. सोनवणे, एच. डी. गांगुर्डे, एच. एन. कोर, एस. एस. कदम, एस. एम. पाटील, आर. डी. शिंदे, व्ही. बी. शेवाळे, जयश्री अहिरे, वैशाली कापडणीस, सागर सोनवणे, देवेंद्र भामरे, संगीता भामरे, जे. आर. वाघ, एम. आर. शिरसाठ, पी. एन. पवार, एम. जे. गावित, आशिष अहिरे आदींसह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. 

दहावी उत्तीर्ण होऊन सर्व विद्यार्थी आता शाळेतून महाविद्यालयात दाखल होतील. त्यावेळी हे विद्यार्थी खऱ्या अर्थाने सामाजिक जीवनाचा भाग बनतील. शालेय जीवनापासून या विद्यार्थ्यांमध्ये समाजकार्याची आवड रुजल्याने भविष्यात हीच आवड त्यांची खरी प्रेरणा बनेल.

- बी. एस. देवरे, मुख्याध्यापक, लोकनेते पं. ध. पाटील मराठा इंग्लिश स्कूल

Web Title: uniforms for economically backward students