Nashik Crime
esakal
सोशल मीडियावर धमकीसदृश रील पोस्ट करणाऱ्या तिघा तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
शहरात भीती आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता.
पोलिसांनी तत्काळ तपास सुरू करून आरोपींचा शोध लावला.
वणी (नाशिक) : सोशल मीडियावर दहशत निर्माण करणारा व्हिडिओ पोस्ट केल्याप्रकरणी वणी पोलिसांनी (Vani Police) तिघा तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांची शहरभर धिंड काढली. इंस्टाग्रामवर "डोक्यात झांज" म्हणत धमकीसदृश रील पोस्ट करून समाजात भीती आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाल्यानंतर पोलिसांनी तत्पर कारवाई केली.