वणी (नाशिक) : ओझरखेड धरणही सलग तिसऱ्या वर्षी तुडुंब

दिगंबर पाटोळे
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

वणी (नाशिक) : दिंडोरी तालुक्यातील वाघाड, करंजवण पाठोपाठ ओझरखेड धरणही सलग तिसऱ्या वर्षी तुडुंब झाले असून, तालुक्यातील तीसगांव धरण वगळता इतर तीन धरणांतही सरासरी ९० टक्के जलसाठा झाल्याने तेही भरण्याच्या मार्गावर आहे.

वणी (नाशिक) : दिंडोरी तालुक्यातील वाघाड, करंजवण पाठोपाठ ओझरखेड धरणही सलग तिसऱ्या वर्षी तुडुंब झाले असून, तालुक्यातील तीसगांव धरण वगळता इतर तीन धरणांतही सरासरी ९० टक्के जलसाठा झाल्याने तेही भरण्याच्या मार्गावर आहे.

दिंडोरी तालुक्यात महिनाभरापासून पावसाची सतंतधार असून आहे. पावसाचा जोर नसला तरी संततधार पावसामुळे तालुक्यातील सहाही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात वाढ होत असून १५ दिवसांपूर्वी ओव्हरफ्लो झालेल्या वाघाड धरणा पाठोपाठ कंरजवण व ओझरखेड धरणही ओव्हरप्लो झाले आहे. मागील पंधरा दिवसांपूर्वी तालुक्यात झालेल्या पर्जन्यवृष्टीमुळे पूणेगाव धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. विसर्गाद्वारे सोडले होते सोडलेले पाणी तेथ ओझरखेड धरणात आल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली होती. सलग तीसऱ्या वर्षी धरण भरल्याने  लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांबरोबरच वणीकरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान तालुक्यातील पूणेगाव, तिसंगाव व पालखेड धरणही भरण्याच्या मार्गावर असल्याने तालुकावासींयामध्ये समाधानाचे वातावरण आहॆ. दरम्यान तालुक्यात पावसाची सतंतधार सुरुच करत असल्याने धरणातील पाणी सांडव्यात वाटे उनंदा नदीपात्रात सोडण्यात आल्याने नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे तसेच धरणाच्या सांडव्यालगत व अन्य धोक्याच्या  ठिकाणी तरुणांनी उभे राहून सेल्फी काढण्याचा मोह टाळावा असे आवाहन पोलीस प्रशासनाचे वतीने करण्यात आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wani (Nashik): For the third consecutive year Ozarkhed dam is full