धुळे- जिल्ह्यात उन्हाच्या चढ-उतारामुळे जिवाची काहिली होते. सरासरी ४० ते ४२.६ अंश सेल्सियसपर्यंत तापमान जात आहे. आगामी काही दिवसांत त्यात वाढ होण्याचा अंदाज असून, त्यातच जिल्ह्यातील प्रकल्पांतील पाण्याची पातळी झपाट्याने घटते. .परिणामी, ग्रामीण भागातील पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर होत चालला. लघु व मध्यम प्रकल्पांत पाण्याचा उपयुक्त साठा ५३ (२४२.१८ दलघमी) टक्के आहे, जो गेल्या वर्षीच्या तुलनेत २८ टक्के अधिक असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली..गेल्या वर्षी नऊ एप्रिलला मुकटी, अमरावती, वाडीशेवाडी व सोनवद हे चार प्रकल्प कोरडे पडले होते. आजच्या घडीला जिल्ह्यातील एकूण १२ मध्यम प्रकल्पांमध्ये एकूण ५९, तसेच एकूण ४५ लघु प्रकल्पांत ३८ टक्के उपयुक्त जलसाठा उपलब्ध आहे. या स्थितीत पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे..टंचाईशी सामना शक्यजिल्ह्यात १२ मध्यम व ४५ लघुप्रकल्प आहेत. प्रकल्पांची क्षमता ४९४.८६ दशलक्ष घनमीटर पाणी एवढी आहे. लघुप्रकल्पांची जलसंचयन क्षमता १२१.९७ दशलक्ष घनमीटर एवढी असताना लघुप्रकल्पांत ३८ टक्के जलसाठा शिल्लक आहे. मध्यम प्रकल्पांची जलसंचयन क्षमता ४७१.४३ दशलक्ष घनमीटर आहे. सध्या त्यात ५९ टक्के जलसाठा आहे. पाण्याची यंदाची ही स्थिती अतिशय बिकट नसली, तरी जिल्ह्यातील शंभराहून अधिक गावे व पाड्यांना मेमध्ये पाणीटंचाईला तोंड द्यावे लागेल, अशी स्थिती आहे. यंदा मे व जूनमध्ये पाणीटंचाईची अवस्था दाहक होण्याची चिन्हे आहेत..सुलवाडेत सर्वाधिक साठाबाष्पीभवनामुळे पाणीसाठा कमी होत असल्याने त्याचा थेट परिणाम जिल्ह्यातील धरणांमधील उपयुक्त जलसाठ्यावरही होत असल्याची स्थिती आहे. जिल्ह्यात सद्य:स्थितीत सर्वाधिक सरासरी ९८ टक्के उपयुक्त जलसाठा सुलवाड प्रकल्पात आहे. त्यापाठोपाठ ७० टक्के मुकटी व अनेर प्रकल्पात ६६ टक्के जलसाठा आहे. जामखेडी २७, कनोली २५ आणि सोनवद प्रकल्पांत सर्वात कमी २१ टक्के साठा आहे. .साक्री शहरासह तालुक्यातील १६ गावांना टंचाईला तोंड द्यावे लागत असल्याने जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या निर्देशावरून २४ मार्चला मालनगाव धरणातून पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले. त्याचा लाभ कान नदीकाठावरील मालनगाव, खांडबारा, बोडकीखडी, दहिवेल, सातरपाडा, भोनगाव, बोदगाव, आमोडे, किरवाडे, सुरपान, घोडदे, ढेलीपाडा, अष्टाणे, छडवेल, पखरुण, कावठे आणि साक्री शहराला झाला..जिल्ह्यात प्रकल्पीय साठापाटबंधारे विभागाच्या नऊ एप्रिलच्या साप्ताहिक जलपातळी अहवालानुसार धुळे तालुक्यातील १९, शिंदखेडा दोन, शिरपूर बारा आणि साक्री तालुक्यातील बारा अशा एकूण जिल्ह्यातील ४५ लघु तलावांमध्ये ४८.१२७ दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे. यंदा बुरझड, गोंदूर, निमगूळ (ता. धुळे), शेवाडे (ता. शिंदखेडा), कालीकराड, रोहिणी (ता. शिरपूर), काबर्याखडक (ता. साक्री) हे लघु तलाव कोरडेठाक पडले आहेत..जिल्ह्यातील प्रकल्पीय जिवंत जलसाठा दलघमी (कंसात आजची स्थिती दलघफू) असा : पांझरा ३५.६३ (५३९.९७), मालनगाव ११.३३ (१५३.२७), जामखेडी १२.३४ (१२२.५४), कनोली ८.४५ (७७.३४), बुराई १४.२१ (१७०.२२), करवंद १८.२६ (२५७.२७), अनेर ४९.२७ (११७४.९३), सोनवद १४.३६ (१११.४९), अक्कलपाडा ४३.७७ (८४७.९१), वाडीशेवाडी ३३.९१ (६४८.९५), अमरावती २१.२५ (४९३.००), सुलवाडे ६५.०६ (२२५५.९२) तसेच जिल्ह्यातील सुमारे ४५ लघु प्रकल्पांत १२६.०९ (१६९९.६१), असा एकूण २४२.१८ (८५५२.४१) दलघमी साठा आहे..पाणीटंचाईचा प्रश्न कायमजिल्ह्यातील प्रकल्पांमधील जलसाठा कमी होत असल्याचा थेट परिणाम आगामी काळात निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईवर जाणवण्याची शक्यता आहे. भूगर्भातील पाणी पातळी कमी होऊन सार्वजनिक विहिरी, बोअरचे पाणी कमी झाल्यास भविष्यामध्ये टँकरची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे. एप्रिलच्या प्रारंभीच पाणीटंचाई आणि टँकरसाठी मागणी सुरू झाली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठका, जलनियोजन करणारे सरकारी विभाग, केंद्र आणि राज्य सरकारचा पाणीपुरवठा विभाग, पाणी योजना अनेकदा राबवल्या गेल्या आहेत. त्यासाठी मोठा खर्चही केला गेला. मात्र, तरीही ग्रामीण भागातील पाणीटंचाईचा प्रश्न कायम असतो, हे नेहमीचे वास्तव आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.