ग्रामस्थांच्या दातृत्वातून रोहिणी नदीपात्राच्या खोलीकरणाला वेग!

प्रा. भगवान जगदाळे
रविवार, 7 जुलै 2019

यावर्षी कधी नव्हे एवढ्या भयंकर दुष्काळी परिस्थितीला व पाणीटंचाईला निजामपूर-जैताणेसह माळमाथा परिसरातील नागरिकांना सामोरे जावे लागले. त्या पार्श्वभूमीवर आगामी उपाययोजना म्हणून ग्रामपंचायतीसह निजामपूरकरांनी हा विधायक लोकोपयोगी उपक्रम हाती घेतला आहे. रोहिणी नदीवरील मोठ्या पुलाच्या पश्चिमेकडील नदीपात्रासह केटीवेअर बंधाऱ्याचेही जेसीबीद्वारे खोलीकरण प्रगतीपथावर आहे.

निजामपूर-जैताणे (धुळे) : येथील 'पाणी अडवा, पाणी जिरवा' समितीच्या पुढाकाराने रोहिणी नदीपात्राच्या खोलीकरणाचे सुरू असलेले काम प्रगतीपथावर असून निजामपूर ग्रामपंचायतीसह विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक संस्था, सहकारी बँका, पतसंस्था, व्यावसायिक, व्यापारी, लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांनी आर्थिक सहभाग नोंदवत दोनच दिवसात सुमारे दोन लाखाचा भरीव निधी संकलित करून लोकसहभागाच्या या अनोख्या आदर्शाने कामाला वेग मिळाला आहे.

यावर्षी कधी नव्हे एवढ्या भयंकर दुष्काळी परिस्थितीला व पाणीटंचाईला निजामपूर-जैताणेसह माळमाथा परिसरातील नागरिकांना सामोरे जावे लागले. त्या पार्श्वभूमीवर आगामी उपाययोजना म्हणून ग्रामपंचायतीसह निजामपूरकरांनी हा विधायक लोकोपयोगी उपक्रम हाती घेतला आहे. रोहिणी नदीवरील मोठ्या पुलाच्या पश्चिमेकडील नदीपात्रासह केटीवेअर बंधाऱ्याचेही जेसीबीद्वारे खोलीकरण प्रगतीपथावर आहे.

शुक्रवारी (ता.5) सकाळी अकराच्या सुमारास निजामपूर ग्रामपंचायतीतर्फे सरपंच सलीम पठाण यांच्या हस्ते 51हजार रुपये भरीव आर्थिक मदतीचा धनादेश पाणी अडवा, पाणी जिरवा समितीचे सदस्य नयनकुमार शाह यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी माजी सरपंच अजितचंद्र शाह, पंचायत समिती सदस्य वासुदेव बदामे, ग्रामविकास अधिकारी पी.बी. मोराणे, समिती सदस्य नितीन शाह, राजेश शाह आदी उपस्थित होते.

अन्य दाते याप्रमाणे : क्वालिटी सोशल ग्रुप 21 हजार; वासुदेव बदामे 14 हजार आठशे; आदर्श विद्या मंदिर व जवाहरलाल वाचनालय प्रत्येकी 11 हजार रुपये; स्वामी विवेकानंद पतसंस्था, समर्थ पतसंस्था, गोकुळदास शाह पतसंस्था, नंदुरबार मर्चंट बँक-निजामपूर शाखा, नंदकुमार विसपुते, प्रा.डॉ. रवींद्र ठाकरे प्रत्येकी 5100 रुपये; सदाशिव शेवाळे, प्रवीण जमनादास शाह, अरुण मुरलीधर वाणी, डॉ.हेमंत पाटील प्रत्येकी 3100 रुपये; रवींद्र सीताराम वाणी 2100 रुपये; जाकीर तांबोळी, संजीवन पवार, विलास देसले, विशाल मोहने, आसिफखान पठाण, कालूभाऊ वाघ व सुनील बागले आदींनी प्रत्येकी 1100 रुपये देणगी दिली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: water resources work in Nijampur Dhule