फैजपूर (ता. यावल)- शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सुकी धरणात सध्या ७७.९४ टक्के साठा उपलब्ध असून, मुबलक पाणीसाठा असल्याने फैजपूर शहरासह परिसरातील गावांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. केळी पट्ट्यातील पाल, लोहारा, गौरखेडा, कुंभारखेडा, उटखेडा, चिनावल, वडगाव, निंभोरा, चिनावल, विवरा, वाघोबा, दसनूरष तर खिरोदा, रोझोदा, कळमोदा, न्हावी या शेती शिवारात सिंचनासाठीही याचा फायदा होणार आहे.