समन्वयातून ग्रामीण प्रश्न मार्गी लावू

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 4 February 2020

शिरपूर : निधी नसल्याच्या कारणावरून विकासकामे बंद पडू दिली जाणार नाहीत. जिल्हा परिषदेसाठी 50 कोटींचा वाढीव निधी मिळवला आहे. मात्र विकासकामे दर्जेदार होणे अपेक्षित आहे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या समन्वयातून ग्रामीण भागाचे प्रश्नस मार्गी लागतील याची जाणीव ठेवून काम करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. तुषार रंधे यांनी केले.

शिरपूर : निधी नसल्याच्या कारणावरून विकासकामे बंद पडू दिली जाणार नाहीत. जिल्हा परिषदेसाठी 50 कोटींचा वाढीव निधी मिळवला आहे. मात्र विकासकामे दर्जेदार होणे अपेक्षित आहे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या समन्वयातून ग्रामीण भागाचे प्रश्नस मार्गी लागतील याची जाणीव ठेवून काम करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. तुषार रंधे यांनी केले.

येथील पंचायत समितीच्या मासिक सभेत ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण सभापती श्रीमती मोगरा पाडवी, पंचायत समितीचे सभापती सत्तारसिंह पावरा, उपसभापती धनश्री बोरसे, गटविकास अधिकारी वाय. डी. शिंदे, सहायक अधिकारी सुवर्णा पवार, गटशिक्षणाधिकारी एस. सी. पवार आदी उपस्थित होते.

लोणीकरांचा शिरपूर येथे निषेध

ग्रामसेवकांशी करणार चर्चा

श्री. रंधे म्हणाले, की बहुतांश लोकप्रतिनिधींची ग्रामसेवकांबाबतीत असहकार्याची तक्रार असते. त्यामुळे ग्रामसेवकांशी चर्चा करण्यासाठी लवकरच स्वतंत्र बैठक घेऊ. त्यांच्या समस्या समजून घेऊन जबाबदारीची जाणीव करून देणार आहे. मोठ्या लोकसंख्येच्या गावांसाठी पूर्णवेळ ग्रामविकास अधिकारी द्यावा. त्याच्यावर अतिरिक्त ग्रामपंचायतींची जबाबदारी देऊ नये, अशा सूचना त्यांनी केल्या.

आरोग्य विभागातर्फे तालुका अधिकारी डॉ. प्रसन्न कुलकर्णी, महिला व बालकल्याण विभागातर्फे बालविकास प्रकल्प अधिकारी एस. बी. शिंदे, बांधकाम विभागातर्फे प्रभारी उपअभियंता जे. पी. गांगुर्डे, लघु सिंचनतर्फे आर. एस. भामरे, पशुधन विभागातर्फे डॉ. संजय कुंवर, शिक्षण विभागातर्फे एस. सी. पवार, ग्रामपंचायत विभागातर्फे विस्तार अधिकारी एस. एस. पवार, आर. झेड. मोरे, एस. टी. महामंडळातर्फे स्थानकप्रमुख मनोज पाटील यांनी माहिती दिली.

अंगणवाडीसाठी भरती

अंगणवाडीसाठी मदतनीस आणि सेविका या पदांच्या रिक्त जागांची लवकरच भरती केली जाणार आहे. तसा आदेश वरिष्ठ स्तरावरून प्राप्त झाला आहे. "पेसा' क्षेत्रातील अनुदान बंद असलेल्या 42 अंगणवाड्यांबाबत प्रशासनाकडे प्रस्ताव दिला आहे, अशी माहिती सचिन शिंदे यांनी दिली. वीज मंडळ व आदिवासी प्रकल्प विभागाचे प्रतिनिधी सभेला कायम अनुपस्थित राहत असल्याची तक्रार केली. सर्व शिक्षा अभियानातील मदत बंद झाल्याने शाळा बांधकामासाठी "मनरेगा'मधून तरतूद करावी, अशी सूचना डॉ. रंधे यांनी केली.

नंदुरबार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: We will solve rural issues through coordination, says Randhe