लोणीकरांचा शिरपूर येथे निषेध

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 4 February 2020

धुळे : भाजपचे नेते तथा माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी महिला तहसीलदारांचा "हिरोईन' म्हणून उल्लेख केला. त्यांच्या या विधानाबाबत ठिकठिकाणी रोष व्यक्त केला जात आहे. त्याचे पडसाद शिरपूर येथे उमटले. त्यांचा प्रतिकात्मक पुतळा दहन, जोडो मारो आंदोलनातून राष्ट्रवादी कॉंग्रेसने निषेध केला.

धुळे : भाजपचे नेते तथा माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी महिला तहसीलदारांचा "हिरोईन' म्हणून उल्लेख केला. त्यांच्या या विधानाबाबत ठिकठिकाणी रोष व्यक्त केला जात आहे. त्याचे पडसाद शिरपूर येथे उमटले. त्यांचा प्रतिकात्मक पुतळा दहन, जोडो मारो आंदोलनातून राष्ट्रवादी कॉंग्रेसने निषेध केला.

परतूर (जि. जालना) तालुक्या.तील वीज उपकेंद्राच्या लोकार्पण सोहळ्यात लोणीकर यांनी आक्षेपार्ह विधान केले. "शेतकऱ्यांना हेक्टारी 25 हजारांची नुकसान भरपाई हवी असेल तर मोठा मोर्चा काढावा लागेल, त्यासाठी कुणाला आणू तुम्ही सांगा, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना आणू...की एखादी हिरोईन आणू...जर हिरोईन मिळाली नाही तर आपल्या स्टेजवर बसलेल्या तहसीलदार मॅडम हिरोईनच आहेत... त्याही हिरोईनसारख्या दिसतात', असे वादग्रस्त विधान लोणीकर यांनी केले. नंतर हिरोईन या शब्दाचा अर्थ डॅशिंग, कर्तबगार असा आहे, त्यामुळे हिरोईन शब्दाचा अपमान करू नका, असे म्हणत त्यांनी सावरासावरीचा प्रयत्न केला. या आक्षेपार्ह विधानानंतर लोणीकर यांच्याविरुद्ध राज्यात टीकेची झोड उठली.

दादू, छकुली मला माफ करा...शेतकरी बापाची आत्महत्येपुर्वी चिठ्ठी

या पार्श्वचभूमीवर शिरपूर येथे लोणीकर यांचा त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडो मारो आंदोलन करून, पुतळा दहनातून निषेध केल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष ज्योती पावरा यांनी दिली.

शिरपूर येथील गणेश मंदिर परिसरात आंदोलन करताना शेतकरी, महिलांबाबत आक्षेपार्ह विधान करणारे भाजपचे नेते, माजी मंत्र्यांना सुबुद्धी देण्यासाठी श्री गणेशाला प्रार्थनाही केली. भाजपची नेते मंडळी वाट्टेल तसे महिला, शेतकऱ्यांविषयी बोलत असतात. त्याचा अनुभव त्यांचे सरकार सत्तेत असताना व नसताना जनता घेत आहे. त्यात लोणीकरांची भर पडली आहे. त्यांनी महिला वर्गाचा अपमान केल्याने त्यांचा निषेध केल्याची माहिती आंदोलक सौ. पावरा, जिल्हा सचिव मालती पाडवी, शिरपूर तालुकाध्यक्षा जयश्री ठाकरे, उपाध्यक्षा सत्यवती पावरा, प्रियांका पावरा, दुर्गा पावरा, शीतल पावरा, ऊर्मिला पावरा, सायली पावरा, तसेच तालुकाध्यक्ष रमेश करंकाळ, शहराध्यक्ष युवराज राजपूत, नरेंद्र करंकाळ, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य चंद्रकांत पवार, आशिष अहिरे, पंडित पावरा, धनराज मोरे, नितीन निकम, राहुल साळुंखे, जुनेद खान, सुधीर चव्हाण, प्रफुल पाटील यांनी दिली.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Protest against Lonikar at Shirpur