तुळशी विवाहानंतर 'इतके' दिवस थांबा..मगच "शुभमंगल सावधान"

रोशन भामरे :सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

दरवर्षीप्रमाणे दिवाळी सणानंतर तुलसीविवाह झाला की, विवाह मुहूर्तना सुरुवात होत असते. परंतु यावर्षी तुलसीविवाहानंतर तब्बल सात दिवसांनी विवाह मुहूर्त प्रारंभ होणार आहेत. तसेच या वर्षी डिसेंबर महिन्यापासून गुरुचा अस्त असल्यामुळे महिनाभर शुभ मुहूर्त राहणार नाही. विशेष म्हणजे गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी ४६ शुभ मुहूर्त आहेत.

नाशिक : दिवाळीच्या सणानंतर यंदा कर्तव्य आहे,असे म्हणणाऱ्यांना आता तुळशी विवाह झाल्यानंतर सात दिवसानंतर लग्नाचे बाशिंग बांधा येणार आहे. तर या वर्षी डिसेंबर महिन्यापासून गुरुचा अस्त असल्यामुळे महिनाभर विवाहांना ब्रेक लागणार आहे. नोव्हेंबर महिन्यात फक्त अकरा शुभमुहूर्त असल्याने लग्नसराई विवाहाच्या तारखा कमी होणार आहेत.त्यामुळे वधू -वर पित्यांना लगीन घाईसाठी मोठी धडपड करावी लागणार आहे.यंदा विवाहासाठी ४६ शुभमुहूर्त आहेत. गेल्यावर्षी गुरूचाअस्तानाही ८६ शुभमुहूर्त होते.

यंदा तुळशी विवाहानंतर ७ दिवसांनी मुहूर्ताला प्रारंभ

दरवर्षीप्रमाणे दिवाळी सणानंतर तुलसीविवाह झाला की, विवाह मुहूर्तना सुरुवात होत असते. परंतु यावर्षी तुलसीविवाहानंतर तब्बल सात दिवसांनी विवाह मुहूर्त प्रारंभ होणार आहेत. तसेच या वर्षी डिसेंबर महिन्यापासून गुरुचा अस्त असल्यामुळे महिनाभर शुभमुहूर्त राहणार नाही. विशेष म्हणजे गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी ४६ शुभमुहूर्त आहेत.ऑक्टोबर महिन्यात शुक्रवारी धनत्रयोदशी त्यानंतर नरक चतुर्दशी २७ सप्टेंबरला लक्ष्मीपूजन,२८ ऑक्टोबरला बालप्रतिपदा २९ऑक्टोबरला भाऊबीज झाली. त्यानंतर कार्तिकी पौर्णिमेला १२ नोव्हेंबर रोजी तुलसीविवाह समाप्ती होणार आहे. त्यानंतर २०नोव्हेंबर पासून शुभमुहूर्ताचा योग येणार आहे. 

 गुरु अस्तामुळे महिनाभर विवाहांना लागणार ब्रेक     

तुळशीविवाहानंतर नोव्हेंबर महिन्यात असलेल्या चार मुहूर्तवर विवाह सोहळ्याची धूम होणार असल्याचे दिसत आहे. तर यावर्षी नोव्हेंबर ते डिसेंबर यादोन महिन्यात एकूण १२ शुभ मुहूर्त असल्याने वधू-वर पित्याची आत्तापासूनच लगीनघाई सुरू झाली आहे. गतवर्षी गुरुचा अस्त असतानाही ८६ शुभ मुहूर्त होते.मात्र यावर्षी गुरु अस्त लग्नसराई असल्यामुळे ४६ मुहूर्तवर त्यांना लगीनघाई करावी लागणार आहे. 

यंदाचे ४६ शुभमुहूर्त 

नोव्हेंबर - २०,२१,२३,२८
डिसेंबर -१,२,३,६,८,११,१२
जानेवारी २०२० -१८,२०,२९,३०,३१ 
फेब्रुवारी -१,४,१२,१४,१६,२०,२७
मार्च -३,४,८,११,१२,१९
एप्रिल -१५,१६,२६,२७
मे -२,५,६,८,१२,१४,१७,१८,१९,२४
जून- ११,१४,१५


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Weddings will started after tulsi vivah