Dhule : देशभक्तीपर सायकल रॅलीचे स्वागत

Seema Mahajan felicitating Additional Superintendent of Police Prashant Bachhao in a patriotic cycle rally in the city on Thursday.
Seema Mahajan felicitating Additional Superintendent of Police Prashant Bachhao in a patriotic cycle rally in the city on Thursday.esakal

धुळे : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मुंबईहून दिल्लीला निघालेल्या धुळे व पुणे पोलिस दलातील नऊ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सायकल रॅलीचे गुरुवारी (ता. ४) दुपारी शहरात आगमन झाले.

रॅलीचे शहरात ठिकठिकाणी आतिषबाजी, पुष्पवृष्टी, औक्षणाने उत्स्फूर्त स्वागत झाले. येथील अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या नेतृत्वात मुंबईहून ही रॅली निघाली. या उपक्रमाची पोलिस महासंचालकांनीही दखल घेत प्रशंसा केली आहे. (Welcome of Patriotic Cycle Rally in Dhule Latest Marathi News)

देशभक्ती आणि एकात्मतेचा संदेश देत जिल्हा पोलिस दलाचे अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या संकल्पनेतून व नेतृत्वाखाली निघालेल्या सायकल रॅलीत पोलिस अधिकारी धनंजय येरुळे, शरद पाटील, कर्मचारी दिलीप खोंडे, निवृत्त पोलिस कर्मचारी अनिल जाधव, जितेंद्र परदेशी, प्रकाश माळी, पुणे पोलिस दलातील शिवाजी हावळे, मनोज भंडारी यांचा समावेश आहे.

रॅलीचे गुरुवारी शहरात आगमन झाले. मनोहर टॉकीजजवळील छत्रपती शिवाजी पुतळ्याला रॅलीतील सदस्यांनी अभिवादन केले. या ठिकाणी प्रथम धुळेकरांनी स्वागत केले.

नंतर फुलवाला चौकात बडगुजर सायकल मार्ट आणि गांधी पुतळा चौकात बाप्पा मोरया ग्रुप, आझादनगर पोलिस ठाण्याच्या शांतता कमिटीतर्फे सदस्य उमेश महाजन, सीमा महाजन यांनी पुष्पगुच्छ देत औक्षण करीत रॅलीचे स्वागत केले. अविनाश वाघ, वाल्मीक जाधव, अविनाश लोखंडे, नरेश चव्हाण, तुषार जाधव आदी उपस्थित होते.

Seema Mahajan felicitating Additional Superintendent of Police Prashant Bachhao in a patriotic cycle rally in the city on Thursday.
शिक्षणासाठी दरेवाडीचे चिमुरडे निघाले उपाशीपोटी गटशिक्षणाधिकारी कार्यालयात

रॅलीला मंगळवारी (ता. २) मुंबईतील कुलाबा येथून प्रारंभ झाला. सुमारे एक हजार १५७ किलोमीटर अंतर पार करून रॅली १३ ऑगस्टला दिल्लीत पोचेल. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशातून रॅली जाणार आहे.

रॅलीतील सदस्य रोज सरासरी शंभर ते १२५ किलोमीटर प्रवास करतील. रॅलीसोबत दोन वाहने आहेत. तीन चालक, डॉक्टर व सायकल रिपेअरिंग करणारे आहेत. परतीच्या प्रवासात अधिकारी व पथक याच वाहनांमधून येतील.

"राष्ट्रीय एकात्मता व सामाजिक बांधिलकीतून सायकल रॅली निघाली आहे. रॅलीसाठी वरिष्ठांची परवानगी घेतली आहे. रॅलीत सहभागी अधिकारी व कर्मचारी स्वातंत्र्यादिनानिमित्त १५ ऑगस्टला दिल्लीतील लाल किल्ल्यावरील ध्वजारोहण कार्यक्रमात सहभागी होतील. कार्यक्रम झाल्यानंतर पथक महाराष्ट्रात परतेल." - प्रशांत बच्छाव, अपर पोलिस अधीक्षक, धुळे

Seema Mahajan felicitating Additional Superintendent of Police Prashant Bachhao in a patriotic cycle rally in the city on Thursday.
विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांचे नावाचे बनावट WhatsApp Account!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com