तळोदा- तळोदा शहरासह तालुक्यातील शेतकऱ्यांनी यंदा देखील मोठ्या प्रमाणात गव्हाची पेरणी केली आहे. सध्या गहू काढणीसह मळणीस शेतकऱ्यांनी वेग दिला आहे. मात्र, एप्रिल महिन्याच्या सुरवातीला झालेल्या ढगात वातावरणाचा गहू पिकावर परिणाम झाला आहे. सद्यःस्थितीत वातावरण निवळल्याने गहू काढणीस वेग आला आहे. मात्र, गव्हाच्या एकरी उत्पादनात लक्षणीय घट येणार असल्याचे जाणकार शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.