Agriculture News : तरूण शेतकरी यशोगाथा; शेडनेटच्या साहाय्याने एक एकरात चक्क 35 टन उत्पादन! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dhule: Capsicum growing young farmer Chandrakant Borse.

Agriculture News : तरूण शेतकरी यशोगाथा; शेडनेटच्या साहाय्याने 1 एकरात चक्क 35 टन उत्पादन!

धामणगाव (जि. धुळे) : केल्याने होते रे, आधी केलेची पाहिजे या उक्तीला परिश्रमाची जोड देत, जोखीम पत्करत वेल्हाणे (ता. धुळे) येथील तरुण शेतकरी चंद्रकांत रमेश बोरसे याने शिमला मिरचीच्या एक एकर लागवडीतून पावणेपाच लाखांचा नफा कमविला आहे. दुष्काळी छायेतील आणि कोरडवाहू क्षेत्रातील धुळे तालुक्यात शेडनेटच्या साहाय्याने शेतकरी बोरसे याने धाडसातून शिमला मिरची उत्पादनाचा घेतलेला निर्णय फलदायी ठरल्याचे म्हणावे लागेल. (With help of shednet young farmer yield about 35 tonnes per acre of capsicum dhule news)

जिद्द, चिकाटी आणि पराकाष्ठा या त्रिसूत्रीचा अवलंब केल्यास यश हमखास मिळू शकते ते तरुण शेतकरी बोरसे याने दाखवून दिले आहे. तोट्याची समजली जाणारी शेती शासनाच्या मदतीने शेडनेट उभारून कशी बहरू शकते हेही या अनुकरणीय उदाहरणातून समोर येते.

शेतीकडे वजाबाकीचा व्यवसाय म्हणून पाहिले जाते. पाणी, मनुष्यबळ व आर्थिक टंचाईमुळे शेतीकडे पाठ फिरविणाऱ्या तरुणांची संख्या अधिक दिसते. त्याला छेद देत तरुण शेतकरी बोरसे याने चिकाटीतून शेती कशी किफायतशीर ठरू शकते हेही दर्शविले आहे.

३५ टन उत्पादन

शेतकरी बोरसे याने एक एकरच्या शेडनेटमध्ये शिमला मिरचीचे उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला. यात आतापर्यंत त्याने सरासरी ३५ टन उत्पादन घेतले आहे. वेल्हाणे शिवारात बरीच हलकी व मुरमाड शेती आहे. पाण्याअभावी त्याने शेतीकडे पाठ फिरवली होती.

हेही वाचा : मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

हेही वाचा: Nashik News : शहरातील 323 बेघर निवारा केंद्रात रवाना

मात्र, शेती सोडून रिकामे राहाणे त्याला अस्वस्थ वाटत होते. त्याने शासनाच्या मदतीने शेडनेट उभारले. अल्पजमिनीतून जास्त उत्पादन मिळवावे असा ध्यास घेत त्याने दहा हजार शिमला मिरचीचे रोप लावले. अडीच महिन्यानंतर मिरची उत्पादनास सुरवात झाली.

आठ- आठ दिवसानंतर तोडणीस आलेली मिरची सरासरी पंधरा ते वीस क्विंटलपर्यंत निघू लागली. शेतकरी बोरसे याने शिमला मिरचीसह आता शेडनेटमध्ये काकडीची लागवड केली आहे.

शिमला मिरची उत्पादनात खर्च वजा जाता निव्वळ चार लाख ७५ हजाराचा नफा मिळाल्याने शेतकरी बोरसे याला कष्टाचे चीज झाल्यासारखे वाटत आहे. शेती तोट्याची नसून नफ्याचीही असल्याचे सूत्र समजले, असे तो सांगतो.

हेही वाचा: Nashik News : पहिल्या टप्प्यात 57 ठिकाणी चार्जिंग स्टेशन; 35 ठिकाणी निधी उपलब्ध होणार