धडगाव येथील बालिका विद्यालयात शिक्षणात लिंग समानतावर कार्यशाळा

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 29 January 2020

धडगाव: जिल्हा परिषद शिक्षण विभाग व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने धडगाव येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात ‘शिक्षणात लिंग समानता’ या विषयावर एक दिवशीय कार्यशाळा झाली.

धडगाव: जिल्हा परिषद शिक्षण विभाग व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने धडगाव येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात ‘शिक्षणात लिंग समानता’ या विषयावर एक दिवशीय कार्यशाळा झाली.

कार्यशाळेला एन.सी.ई.आर.टी.दिल्ली येथून लिंग समानता या विषयावर प्रशिक्षण घेऊन आलेले संत दगा महाराज माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक एन.टी.पाटील, उमर्दे येथील न्यू.इंग्लिश स्कूलचे शिक्षक नागसेन पेंढारकर व शिवदर्शन विद्यालयाचे नरेंद्र पाटील यांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत एन.टी.पाटील यांनी विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास कसा वाढविता येईल याविषयी मार्गदर्शन केले. जीवनात आत्मनिर्भर होण्यासाठी मित्रधर्म वाढविणे, विविध विषयांचे वाचन करणे, क्रांतिकारक, समाजसुधारक, देशभक्त यांच्या कथा व माहिती वाचणे का गरजेचे आहे हे पटवून दिले.

आदिवासी प्रकल्प कार्यालयात २० लाखांचा गैरव्यवहार

तसेच नरेंद्र पाटील यांनी मासिक पाळी हा विटाळ नाही तर ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्यामुळे समाजामध्ये अनेक अंधश्रद्धा किंवा नकारार्थी विचार आहेत. यादरम्यान विद्यार्थिनींनी कशा प्रकारे आपल्या मानसिक व भावनिक गरजा ओळखून स्वच्छता ठेवावी, याविषयी उद्बोधन केले. तर नागसेन पेंढारकर यांनी अत्याचारापासून स्वसंरक्षण करण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत, याविषयीची माहिती दिली. बालविवाह कायद्याने गुन्हा आहे, त्यासाठी कायदेशीर कठोर शिक्षेची तरतूद आहे. हा बालविवाह रोखण्यासाठी पथनाट्याच्या माध्यमातून समाजात जनजागृती करता येईल, असे त्यांनी सांगितले.

महिलांचे प्रश्‍न रामभरोसेच

विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती पल्लवी जाधव यांनी सत्कार केला. तर जितेंद्र निकुंभ यांनी प्रास्ताविक केले. यावेळी नारसिंग पाडवी, सुनील सूर्यवंशी, ओ.एन.पाटील, चेतन सूर्यवंशी, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Workshop on Gender Equality in Education at Girls' School, Dhadgaon