Crime
sakal
जळगाव/यावल: ‘इन्स्टाग्राम’वर शिवीगाळ करणारा रील बनविल्याच्या वादातून यावल-शेळगाव बॅरेज रस्त्यावर एका १८ वर्षीय युवकाला पाळत ठेवून अडविण्यात आले. सात ते आठ संशयितांच्या बेदम मारहाणीनंतर मरणासन्न अवस्थेत तरुणाला सोडून मारेकऱ्यांनी पळ काढला. ही घटना मंगळवारी (ता. २) सायंकाळी सातच्या सुमारास घडली. जखमी तरुणावर शर्तीचे उपचार सुरू असताना, जळगाव जिल्हा रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. तुषार चंद्रकांत तायडे (वय १९, रा. समतानगर, जळगाव) असे मृत युवकाचे नाव आहे.