जमावावर गुन्हा पण "टिकटॉक सिंघम' चे काय ,निरीक्षक धनवडेंवर कारवाई केव्हा

yawal pi  arun dhanwade
yawal pi arun dhanwade

जळगाव : यावल येथील पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांची जळगावच्या एमआयडीसी पोलिस ठाण्यात बदलीचा प्रस्ताव वरिष्ठांना पाठवला होता. बदली होण्यापूर्वीच व्हॉट्‌सअप ग्रुपवर धनवडेंच्या सत्काराचे फोटो व्हायरल होऊन यावल पोलिस ठाण्यामध्ये लॉकडाऊनचे आदेश झुगारून त्यांच्या बदलीच्या विरुद्ध सोमवारी (ता.27) जमाव एकवटला होता. याबाबत "सकाळ'ने बातमी प्रसिद्ध केल्यावर वरिष्ठांनी दखल घेत जमावाविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आज वीस संशयितांच्या नावानिशी गुन्हे नोंदविण्यात आले मात्र, यावल शहरात "टिकटॉक सिंघम' म्हणुन प्रसीद्ध निरीक्षक अरुण धनवडेंवर कारवाई केव्हा अशीही विचारणा होऊ लागली आहे. 

यावल पोलिस ठाण्याचे निरीक्षक अरुण धनवडे यांची जळगावच्या एमआयडीसी पोलिस ठाण्यात बढतीवर बदली झाल्याचा कांगावा दस्तुरखुद्द निरीक्षक धनवडेंनी चालवला होता. गावचौथऱ्यावर उभे राहुन सिंघम स्टाईल व्हायरल झालेल्या टिकटॉक व्हिडीओने चर्चेत आलेल्या या निरीक्षकाने गल्लोगल्ली सत्कार समारंभ करीत असतानाच सोमवारी पोलिस ठाण्यात शंभर दीडशे लोकांचा जमाव लॉकडाऊनचे आदेश झुगारून एकवटला होता. साहेबांची बदली रद्द होण्यासाठी येथे निवेदने देण्यात येऊन भाषणे झाल्याचे वृत्त "सकाळ'ने प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत अप्पर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांनी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिल्यावरून आज यावल पोलिस ठाण्यात वीस संशयितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. आपण पोलिस खात्यासाठी वेगळेच काम करीत असल्याचा समज निरीक्षक अरुण धनवडेंचा होवुन त्यांना लॉकडाऊनचेही भान राहिले नाही..सत्कार समारंभांसह पोलिस ठाण्यात एकवटलेल्या जमावाला पुढारी थाटात संबोधीत करुन स्वत:ची पाठ त्यांनी थोपटून घेतली मात्र, या प्रकरणात भोळ्या भाबड्या ग्रामस्थांवर गुन्हे दाखल झाले असून टिकटॉक सिंघम अरुण धनवडेंवर अद्याप पर्यंत कुठलीच कारवाई झाली नसली तरी वरीष्ठांनी त्यांना खडेबोल सुनावल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

 बदली रद्दही व्हायरल 
एमआयडीसी पोलिस ठाण्यात होऊ घातलेली बदली रद्द झाल्याची कुणकूण निरीक्षक धनवडे यांना लागल्यानंतर त्यांनी पुन्हा 14 कलमी "धनवडेनामा' लिहून तो व्हॉटस्‌ ऍपवर व्हायरल केला असून, मला बदलून जायचेच नव्हते, असाही आव आणला आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com