Crime
sakal
यावल: येथील बाबूजीपुरा भागातील सहावर्षीय बालकास शेजारीच राहणाऱ्या २२ वर्षीय तरुणाने शुक्रवारी (ता. ५) सायंकाळी सातच्या सुमारास फूस लावून पळवून नेले व त्याचा स्वत:च्या घरातील वरच्या माळ्यावर निर्घृण खून केला. त्यानंतर मृतदेह अर्धवट जाळून टाकला. दरम्यान, पोलिसांकडून बालकाचा शोध सुरू असताना, शनिवारी (ता. ६) सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.