येवला- यशाला कधीही परिस्थिती आड येत नाही हे सिद्ध करत येथील यश भडांगे यांने मुंबई महानगरपालिकेत कनिष्ठ अभियंता या पदासाठीच्या सरळ सेवा भरतीत २६ हजार विद्यार्थ्यांतून सर्वाधिक गुण मिळवत महाराष्ट्रात प्रथम येण्याचा मान मिळविला. सुनील भडांगे या सर्वसामान्य फुल व्यावसायिक कुटुंबातील यशने जिद्दीच्या आणि महत्त्वकांक्षेच्या बळावर मिळवलेल्या या यशाचे कौतुक होत आहे.