भुसावळ- शहरातील भिलवाडीतील बेपत्ता तरुणाचा मृतदेह शुक्रवारी (ता. २१) सायंकाळी आढळून आला. गुन्हेगारी पार्श्र्वभूमी असलेल्या या तरुणाचा पूर्ववैमनस्यातून चाकूने भोसकून खून करून मृतदेह तापी नदीच्या बाजूला असलेल्या खोलगट भागात पुरून टाकल्याची माहिती समोर आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी सायंकाळी सहाच्या सुमारास घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढला.