रावेर- पाल (ता. रावेर) येथील सुकी नदी पात्रात मध्य प्रदेशातील मूळ रहिवासी असलेल्या तरुणाचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला आहे. याबाबत रावेर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. .पाल येथील वन प्रशिक्षण केंद्राच्या खाली सुकी नदी पात्रात पाल गावाकडे जाणाऱ्या कच्चा रस्त्याच्या बाजूला सुरेश सुमऱ्या बारेला (वय २५) या तरुणाचा मृतदेह आढळून आला. हा तरुण मध्य प्रदेशातील कलोरी (ता. जि. खंडवा) येथील मूळ रहिवासी आहे. कामानिमित्त तो दापुरे (ता. एरंडोल) येथे हल्ली वास्तव्यास आहे. त्याच्या मानेवर गळफासाचे व्रण असल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत चिंपी सुरेश बारेला यांनी माहिती दिल्याने रावेर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे..सुरेश बारेला याचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आल्याने परिसरात उलटसुलट चर्चेला ऊत आला आहे. घटनास्थळी पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल, पोलिस उपनिरीक्षक तुषार पाटील यांनी धाव घेतली..घटनास्थळी भेट देऊन जयस्वाल यांनी पोलिसांना तपास कामाबाबत सूचना दिल्या. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. दरम्यान, मृतदेह शवविच्छेदनासाठी रावेर ग्रामीण पाठविण्यात आला. डॉ. वैभव गिरी यांनी शवविच्छेदन केले. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर सुरेशचा मृत्यू कशामुळे झाला, याबाबत कारण स्पष्ट होईल..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.