नगरदेवळ्यात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

शैलेंद्र बिरारी
रविवार, 15 एप्रिल 2018

जितेंद्र पाटील या तरूणाने गळफास कशामुळे घेतली याचे कारण अद्यापही समजुन आले नाही. त्याच्या पश्चात पत्नी दोन मुले, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.

नगरदेवळा (ता. पाचोरा) : नगरदेवळा (ता. पाचोरा) येथील तरूणाने आज (रविवार) सकाळी सव्वा नऊच्या सुमारास स्वतःच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली.

नगरदेवळा (ता. पाचोरा ) येथील मंडपाचा व्यवसाय करणाऱ्या जितेंद्र प्रल्हाद पाटील (वय 36) या तरूणाने कुल्फी कारखान्या समोरील रहात्या घरात सकाळी सव्वानऊ दरम्यान गळफास घेतला असुन त्याचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी रवाना करण्यात आला.

जितेंद्र पाटील या तरूणाने गळफास कशामुळे घेतली याचे कारण अद्यापही समजुन आले नाही. त्याच्या पश्चात पत्नी दोन मुले, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.

Web Title: youth suicide in jalgaon district

टॅग्स