‘अवध’च्या रणांगणात भाजप सावध

योगी आदित्यनाथ यांच्या कारभाराची कोंडी करणाऱ्या घटनांचे पडसाद
UP Assembly Election
UP Assembly ElectionSakal

लखनौ: बालेकिल्ला असलेल्या अवधच्या ५९ जागांवर यावेळी भाजप सावध असल्याचे चित्र आहे. केवळ राज्यातच नव्हे तर, देशाच्या पातळीवर योगी सरकारची सर्वाधिक कोंडी करणाऱ्या घटना या अवधच्या रणांगणातच घडल्याने मतदार पक्षाला सावज बनविणार नाहीत याची काळजी घेताना भाजपला तारेवरची कसरत करावी लागली आहे. उन्नाव अन् हाथरस येथील बलात्काराच्या दुर्दैवी घटना आणि लखीमपूर खेरी येथील शेतकरी हत्याकांडाचे पडसाद या परिसरात भाजपच्या समोरचे मोठे आव्हान आहे.

UP Assembly Election
युक्रेनमधील भारतीय विद्यार्थी रात्रीपर्यंत परतणार; पाठवलं विशेष विमान

समाजवादी पक्ष आणि काँग्रेसने या घटनांवरून योगी सरकारला सतत अडचणीत आणले. प्रचाराच्या रणधुमाळीत तर संपूर्ण उत्तर प्रदेशात विरोधी पक्षाच्या नेत्यांनी या घटनांना प्रमुख आधार घेतला होता.

‘अवध’ हा तसा शहरी आणि ग्रामीण मतदारांची मोठी संख्या असलेला प्रांत आहे. एकूण नऊ जिल्ह्यात लखनौ वगळता इतर भाग शेतीवर अवलंबून आहे. ब्राह्मण, ठाकूर, क्षत्रिय आणि कूर्मी हा शेती असलेला मोठा समाज अवधमध्ये आहे. तर अनुसूचित जाती (एससी), लोध (राजपूत), राठोड, पासी हा शेतमजूर असणारा समाज मोठा आहे. या ५९ मतदारसंघात मुस्लिम मतदारांचाही मोठा वर्ग आहे.

UP Assembly Election
युक्रेनमधील भारतीय विद्यार्थी रात्रीपर्यंत परतणार; पाठवलं विशेष विमान

हाथरस अन् उन्नावमध्ये दलित मुलीवर बलात्काराची घटना योगी सरकारने योग्य पद्धतीने हाताळली नसल्याने या समाजात सरकार विरोधात तीव्र संताप आहे. तर, शेतकरी हत्याकांडाने कूर्मी, शीख समाजाने भाजपला धडा शिकवण्याची जाहीर भाषा केली आहे. शेतमजूर समाजाला कोरोनाचे लॉकडाउन अन् वाढत्या महागाईने बेजार केल्याचे स्पष्ट चित्र या भागात दिसते. हाताला काम नाही, खायला अन्न नाही, अशी खंत हे शेतमजूर व्यक्त करतात.

या सर्व प्रकरणामुळे जातीय राजकारणाला पुन्हा महत्त्व आले असले तरी, मोठा ‘ओबीसी’ समाज समाजवादी पक्षाकडे झुकल्याचे जाणवते. त्यातच भाजपचे मंत्री असलेले ‘ओबीसी’ नेते स्वामीप्रसाद मौर्य यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे. तर महान दलचे केशवदेव मौर्य यांनाही अखिलेश यादवने आपल्या आघाडीत आणले आहे. या दोन्ही ओबीसी नेत्यांची समाजावर मजबूत पकड आहे.हे नेते २०१७ मध्ये भारतीय जनता पक्षासोबत असल्याने ५९ पैकी तब्बल ५१ जागा भाजपला मिळाल्या होत्या. आता या मोठ्या समाजाच्या भूमिकेवरच भाजपचे भवितव्य टांगणीला लागल्याचे इथे फिरताना जाणवते.

दरम्यान, लखनौ शहरासह परिसरात कोरोनाने थैमान घातले तेव्हा शेकडो बळी गेले. ऑक्सिजनच्या तुटवड्याने लाखो नागरिक हैराण झाले. याचे सावट लोकांच्या मनात अद्यापही घर करून बसल्याचे दिसते. त्यामुळे भाजपसाठी या ५९ जागांची लढाई निकराची आहे.

चौरंगी लढतीचा प्रांत

अवधमध्ये पहिल्यांदाच चौरंगी लढतीचे चित्र निर्माण झाले आहे. भाजप सह समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, आणि काँग्रेसचे उमेदवार रिंगणात असून सर्वच पक्षांनी ताकद लावली आहे. पिलीभीत, लखीमपूर, सीतापूर, लखनौ हे भाजपचे पारंपरिक मतदारसंघ आहेत. तर हरदोई, उन्नाव अन् बांदामध्ये बसपचा केडर मजबूत आहे. फतेहपूर व रायबरेलीत काँग्रेसची काही जागांवर मजबूत पकड आहे. अशा स्थितीत मतांचे विभाजन नेमके कुणाच्या पथ्यावर पडणार याची उत्सुकता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com