उत्तर प्रदेशात 223 हून अधिक मुस्लिम उमेदवारांचा पराभव; 97 टक्के उमेदवारांचं डिपॉझिट जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Uttar Pradesh Assembly Election

यावेळी उत्तर प्रदेश विधानसभेत मुस्लिम लोकप्रतिनिधींची संख्या वाढलीय.

उत्तर प्रदेशात 223 हून अधिक मुस्लिम उमेदवारांचा पराभव

लखनऊ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीची (Uttar Pradesh Assembly Election) रंगीत तालिम संपलीय. जनता जनार्दननं आपला कौलही दिलाय. निवडणुकीत 255 जागा जिंकून भाजप पुन्हा सत्तेत आलंय. निवडणुकीचे निकाल (UP Election Result) लागल्यानंतर आता नवे तथ्य समोर येत आहेत. अशीच एक बाब मुस्लिम उमेदवारांबाबत समोर आलीय. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत एकूण 25 मुस्लिम उमेदवार (Muslim Candidates) निवडणूक जिंकून सभागृहात पोहोचले होते. मात्र, या निवडणुकीत 34 मुस्लिम उमेदवार विजयी झाले आहेत. याचाच अर्थ यावेळी उत्तर प्रदेश विधानसभेत मुस्लिम लोकप्रतिनिधींची संख्या वाढलीय.

हेही वाचा: मोठी जबाबदारी देवूनही हरीश रावत ठरले काँग्रेससाठी 'Bad Luck'

विशेष म्हणजे, यावेळी सर्व मुस्लिम उमेदवार समाजवादी पक्षातून (Samajwadi Party) किंवा सपाच्या मित्रपक्षातून निवडणून आले आहेत. बसपा (BSP), काँग्रेस आणि असदुद्दीन औवेसी (Asaduddin Owaisi) यांच्या एआयएमआयएमनं (AIMIM) या निवडणुकीत 223 हून अधिक मुस्लिम उमेदवार उभे केले होते. आश्चर्याची बाब म्हणजे, या सर्वांना पराभवाचा सामना करावा लागलाय. तर, 97 टक्के उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झाल्याचं कळतंय.

एआयएमआयएमनं 60 हून अधिक जागांवर मुस्लिमांना दिलं तिकीट

बसपानं 88 मुस्लिम उमेदवारांना तिकीट दिलं होतं. यापैकी एकही उमेदवार विजयी होऊ शकला नाही. काँग्रेसनं (Congress) यावेळी 399 जागांवर आपले उमेदवार उभे केले होते, त्यापैकी 75 मुस्लिम उमेदवार होते. काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक रिंगणात उतरलेल्या सर्व मुस्लिम उमेदवारांना पराभवाला सामोरं जावं लागलंय. हैदराबादचे (Hyderabad) खासदार असदुद्दीन औवेसी यांच्या एआयएमआयएमनंही 60 हून अधिक जागांवर मुस्लिमांना तिकीट दिलं होतं. या निवडणुकीत एआयएमआयएमचे सर्व उमेदवार तोंडघशी पडलेत. मिळालेल्या माहितीनुसार, बसपा, काँग्रेस आणि एआयएमआयएमनं मुस्लिम समुदायाला खुश करण्याचा प्रयत्न केला खरा, पण यात त्यांना अपयश आलंय. तर दुसरीकडं अखिलेश (Akhilesh Yadav) यांच्या पक्षाच्या मुस्लिम उमेदवारांनी चांगली कामगिरी केलीय.

हेही वाचा: मुस्लिम बहुल भागात कोणाचं 'गणित' चुकलं; सपापेक्षा भाजप का ठरली सरस!

सपाचे 64 पैकी 31 उमेदवार विजयी

यावेळच्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षानं एकूण 64 मुस्लिम उमेदवार उभे केले होते. 'टाइम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार, यापैकी 31 उमेदवार निवडणूक जिंकण्यात यशस्वी ठरले. सपाचे 50 टक्के मुस्लिम उमेदवार विजयी झालेत. याशिवाय, सपा आघाडीत समाविष्ट असलेल्या आरएलडीचे 2 आणि ओमप्रकाश राजभर (Omprakash Rajbhar) यांच्या सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचा 1 मुस्लिम उमेदवार विजयी झालाय.

हेही वाचा: मणिपूरमध्ये भाजपचा पुढचा मुख्यमंत्री कोण? 'या' तिघांत मोठी स्पर्धा

विधानसभेत मुस्लिम प्रतिनिधींची संख्या वाढली

2017 च्या विधानसभा निवडणुकीपेक्षा यंदाच्या निवडणुकीत जास्त मुस्लिम उमेदवार विजयी झाले. गेल्या निवडणुकीत 403 जागांच्या उत्तर प्रदेश विधानसभेत 25 मुस्लिम आमदार होते. यावेळी हा आकडा 34 वर पोहोचलाय. सर्व मुस्लिम उमेदवार सपा किंवा सपा आघाडीशी संबंधित आहेत, हे विशेष! इतर पक्षांचा एकही मुस्लिम उमेदवार विजयी होऊ शकला नाहीय.

Web Title: Defeat Of More Than 223 Muslim Candidates In Up Assembly Election Bsp Aimim Congress

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top