दोन वर्ष होता मुलायमसिंहाचा सुरक्षारक्षक, यंदा अखिलेशविरोधात भाजपने दिली उमेदवारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

SP Singh Baghel and akhilesh Yadav

दोन वर्ष होता मुलायमसिंहाचा सुरक्षारक्षक, यंदा अखिलेशविरोधात भाजपने दिली उमेदवारी

मैनपुरीच्या करहल विधानसभा मतदारसंघातून भाजपने (BJP) केंद्रीय मंत्री आणि आग्राचे खासदार एसपी सिंह बघेल (SP Singh Baghel) यांना उमेदवारी दिली आहे. बघेल हे समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्या विरोधात निवडणूक लढणार आहे. विशेष म्हणजे, बघेल हे दोन वर्ष मुलायमसिंह (Mulayam singh Yadav) यांचे सुरक्षारक्षक होते. यंदा अखिलेशविरोधात भाजपने त्यांना उभे केले आहे. सोमवारी अखिलेश व बघेल यांनी उमेदवारी दाखल केली.

उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) विधानसभा निवडणुकीत (assembaly Election) मैनपुरीची करहाल विधानसभा मतदारसंघाची खूप चर्चा सुरू आहे. करहाल मतदारसंघावर तीन दशकांपासून समाजवादी पक्षाचा दबदबा आहे. समाजवादी पक्षाच्या स्थापनेपासून हा त्याचा बालेकिल्ला आहे. करहाल विधानसभा मतदारसंघात यादव मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. हे मतदार येथे निर्णायक भूमिका बजावतात.

हेही वाचा: मटण खाल्ल्यानंतर हे पदार्थ खाणे टाळा; अन्यथा या परिणामांना तयार राहा

येथील एकूण मतदारांपैकी सुमारे ३८ टक्के मतदार यादव आहेत. मात्र, भाजपच्या (BJP) एसपी सिंह बघेल (SP Singh Baghel) यांच्या आगमनाने ही लढत रंजक झाली आहे. एसपी सिंह बघेल हे समाजवादी पक्षाला चांगलेच ओळखतात आणि त्याचा फायदा त्यांना होईल, असे मानले जात आहे. करहाल विधानसभेतील मतदारांची (assembaly Election) संख्या तीन लाख ७१ हजार आहे. यामध्ये यादव मतदारांची संख्या सुमारे एक लाख ४४ हजार आहे. म्हणजे एकूण मतदारांपैकी ३८ टक्के मतदार यादव आहेत.

फक्त एकदाच पराभव

१९९३ पासून आजपर्यंत म्हणजे २००२ मध्ये फक्त एकदाच सपाला येथे पराभवाला सामोरे जावे लागले. भाजपचे (BJP) सोबरान सिंह यादव सपा उमेदवाराचा पराभव करून विधानसभेत पोहोचले. यावेळी सपा प्रमुख अखिलेश यादव (Akhilesh Yadav) स्वतः या जागेवरून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. गेल्या निवडणुकीत भाजपची लाट असतानाही सपाच्या खात्यात पाच पैकी चार जागा आल्या होत्या.

Web Title: Sp Singh Baghel Bjp Akhilesh Yadav Samajwadi Party Mulayam Singh Yadav Assembaly Election Uttar Pradesh

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top