'यूपी'त भाजपाचा दणदणीत विजय; लखनऊमध्ये योगी पोहचताच गुलालाची उधळण

मुख्यमंत्री योगी भाजप कार्यालयात पोहोचताच फिजामध्ये विजयाच्या घोषणा.
Yogi Adityanath
Yogi AdityanathEsakal

लखनऊ:त्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत (Uttar Pradesh Assembly Election 2022 Result ) भारतीय जनता पक्षाने (BJP) पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने विजय मिळवला आहे. मतमोजणी सुरू असली तरी काही जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. तर काही ठिकाणचे निकाल येणे अजून बाकी आहेत. मात्र उत्तरप्रदेशात भाजपचाच गुलाल उधळणार आहे. भाजपच्या या शानदार विजया दरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी लखनऊ येथील भाजप कार्यालयाला भेट दिली. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. तसेच त्यांचे जल्लोषी स्वागत केले.

Yogi Adityanath
दलित मुख्यमंत्री बनवण्याचा प्रयत्न फसला; काँग्रेसच्या बालेकिल्यात 'आप'चा झेंडा

मुख्यमंत्री योगी भाजप कार्यालयात पोहोचताच फिजामध्ये विजयाच्या घोषणा देत कार्यकर्त्यांनी गुलाल हवेत उडवत विजयाचा आनंद साजरा केला. भाजप कार्यालयात मुख्यमंत्री योगींनी दिग्गज नेत्यांसोबत विजयाची होळी खेळली. गुलालाच्या रंगात रंगलेले योगी यांनी यावेळी भाजप समर्थकांचे मनापासून आभार दिसले.

Summary

मुख्यमंत्री योगी भाजप कार्यालयात पोहोचताच फिजामध्ये विजयाच्या घोषणा देत कार्यकर्त्यांनी गुलाल हवेत उडवत विजयाचा आनंद साजरा केला.

आतापर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार यूपीमध्ये ४०३ जागांपैकी २६८ जागांवर भाजप आघाडीवर आहे. तर समाजवादी पक्ष १३० जागांवर आघाडीवर आहे. निवडणूक कल आणि निकालानुसार बसपा एका जागेवर तर काँग्रेस २ जागांनी पुढे आहे. याशिवाय इतर २ जागांवर ते पुढे आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com