
काँग्रेसनं 10 वर्षे राज्य केलं, तेव्हा पाकिस्ताननं आमच्या देशावर आक्रमण केलं आणि आमच्या जवानांचा शिरच्छेद केला.
'पुलवामा हल्ल्यानंतर मोदींनी Surgical Strike करून दहशतवाद्यांचा खात्मा केला'
Uttar Pradesh Election 2022 : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालीय. निवडणुकांच्या निमित्तानं उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांमध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसनं समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्याविरोधात निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतलाय, तर भाजप पुन्हा सत्तेत राहण्यासाठी जोरदार प्रयत्न करताना दिसतंय.
अलिगड येथील अत्रौलीमध्ये (Atrauli, UP) गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी अखिलेश यादव यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. शहा म्हणाले, अखिलेश बाबू कोरोना लसीला विरोध करायचे. ही भाजपची लस आहे, आम्ही ती लावणार नाही, असं म्हणायचे. अखिलेशनी देशाची आणि उत्तर प्रदेशातील जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला; पण नंतर स्वतःच लसीकरण करून घेतलं. जर लोकांनी त्यांचं ऐकलं असतं आणि लसीकरण केलं नसतं, तर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत ते वाचले असते का?, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.
हेही वाचा: UP Election : भाजपनं खासदाराच्या मुलाचं तिकीट कापलं
ते पुढे म्हणाले, काँग्रेसनं (Congress) 10 वर्षे राज्य केलं, तेव्हा पाकिस्ताननं (Pakistan) आमच्या देशावर आक्रमण केलं आणि आमच्या जवानांचा शिरच्छेद केला. त्यानंतर पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी काहीही केलं नाही; पण उरी आणि पुलवामा हल्ल्यानंतर, पंतप्रधान मोदींनी (Narendra Modi) 10 दिवसांत सर्जिकल स्ट्राइक (Surgical Strike) करून पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचा खात्मा केला, अशी टीका शाहांनी काँग्रेसवर केलीय. त्याचवेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही अखिलेश यांच्यावर हल्लाबोल करत 2013 मध्ये मुझफ्फरनगरात दंगल झाली, तेव्हा लखनौचाच मुलगा सत्तेत होता, अशी टीका त्यांनी केलीय.
Web Title: Uttar Pradesh Election 2022 Amit Shah Criticism Of Congress Akhilesh Yadav
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..