उत्तर प्रदेश : गोरखपूर में का बा? बाबा बाबा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Yogi Adityanath

उत्तर प्रदेश : गोरखपूर में का बा? बाबा बाबा!

गोरखपूर: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ऊर्फ बाबा किंवा महाराज यांच्या गोरखपूर या मतदार संघात प्रवेश केल्यापासून त्यांच्याच नावाचा जयजयकार ऐकायला मिळतो. शहरातील टॅक्सीचालक, रिक्षावाले, लॉज मालकांपासून पोलिसांपर्यंत सर्वांमध्ये बाबांना कोणीच हरवू शकत नाही, अशीच चर्चा ऐकायला मिळते. गोरखपूर में का बा या प्रश्नाचे सर्वामुखी बाबा हेच उत्तर लोकांनी ठरवून टाकले आहे. मात्र, येथील एका मराठी वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर गोरखपूरमधील नऊ जागांची स्थिती मागील निवडणुकीत भाजपच्या बाजूने ८ विरुद्ध एकच्या तुलनेत यंदा ६ विरुद्ध ३ किंवा ७ विरुद्ध २ होऊ शकते, असे मत व्यक्त केले.

हेही वाचा: Uttar pradesh : नोएडात इलेक्ट्रॉनिक पार्क

गोरखपूर शहरात प्रवेश करताच निवडणुकीच्या प्रचाराने जोर धरल्याचे चित्र पाहायला मिळते. रिक्षा, दुचाकी व कारमधून प्रचारासाठी फिरणारे कार्यकर्ते, शहरात दाखल झालेल्या बड्या नेत्यांना रस्ता मोकळा करून देण्यासाठी पोलिसांची सुरू असलेली धावपळ हे चित्र शहरभर पाहायला मिळते. पुण्याप्रमाणेच ३५ लाखांची लोकसंख्या असलेल्या या शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांची, मेट्रोची कामे सुरू असलेली दिसतात व त्यामुळे चौकाचौकांत वाहतुकीची कोंडीही पाहायला मिळते. याबाबत रिक्षाचालक अजयकुमार म्हणाला, बाबाजीने पांच सालमें विकास तो किया है. इसलिए उनका कोई मुकाबला नही. अखिलेशभैया अच्छी फाईट देंगे, लेकिन युपीमें सरकार तो बाबाजीकीही बनेगी. योगीके खिलाफ लडनेवाले चंद्रशेखर आझादकी कोई पहचान नहीं है

हेही वाचा: Uttar Pradesh BJP | उत्तर प्रदेशमध्ये भाजपला आणखी धक्का ! पाहा व्हिडीओ

सामान्य नागरिकांचे हे मत असताना पूर्वांचलात निवडणूक निबंधक म्हणून गेला महिनाभर फिरणाऱ्या काही अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर मात्र वेगळे मत पाहायला मिळाले त्यांच्या म्हणण्यानुसार, अखिलेश यादव आपली प्रतिमा जनसामान्यांत उज्ज्वल करण्यात यशस्वी झाले आहेत व त्यांच्या सभांना जोरदार प्रतिसाद मिळतो आहे. त्यामुळे भाजपला पूर्वांचलातही शेवटच्या टप्प्यात मोठी मेहनत घ्यावी लागेल. असदुद्दीन ओवेसी यांचा प्रभाव खूपच कमी पडत असून, त्यांच्या सभांना गर्दी होताना दिसत नाही. याचा फायदा अखिलेश यांना होऊन भाजपला फटका बसू शकतो. मात्र, मुस्लिम महिलांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न भाजप करीत असल्याने अनेक ठिकाणी अत्यंत टोकदार लढती होतील. दलित मतदार नक्की कोणत्या बाजूला जाईल, हे नक्की सांगता येणे अवघड झाले आहे. त्यामुळे तो मतदार ऐनवेळी कोणाच्या पारड्यात मत टाकतो, हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

कायदा सुव्यस्था प्रचाराचा मुद्दा

कायदा आणि सुव्यवस्था प्रचारातील कळीचा मुद्दा बनला आहे, यावर पोलिस अधिकारीच आश्चर्य व्यक्त करतात. केवळ जातीच्या आधारे लढवली जाणारी निवडणूक या मुद्द्यावर लढवली जात आहे हा राज्य खऱ्या अर्थाने प्रगतीचे दिशेने जात असल्याचे लक्षण असल्याचे हे अधिकारी सांगतात. योगी सरकारने महिला व मुलींना मिळवून दिलेल्या सुरक्षेबद्दल महिला त्यांचे थेट कौतुक करताना दिसतात व पुढील सरकार कोणाचेही आले तरी त्यांना ही परिस्थिती कायम ठेवण्याशिवाय पर्याय नसेल, असे हे अधिकारी स्पष्ट करतात.

Web Title: Uttar Pradesh Gorakhpur Baba Baba

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top