पाच राज्यांच्या निकालांवर शरद पवारांचं भाष्य; आम आदमी पक्षाचं केलं कौतुक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad Pawar Reaction After ED interrogation to Nawab Malik
पाच राज्यांच्या निकालांवर शरद पवारांचं भाष्य; आम आदमी पक्षाचं केलं कौतुक

पाच राज्यांच्या निकालांवर शरद पवारांचं भाष्य; आम आदमी पक्षाचं केलं कौतुक

मुंबई : देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज समोर येत आहेत. या निकालांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. त्यांनी पंजाबमधील आम आदमी पार्टीच्या कामगिरीचं विशेष कौतुक केलं असून काँग्रेसच्या पराभवाचं कारणंही सांगितलं. (Sharad Pawar comment on results of five states assembly elction appreciated Aam Aadmi Party)

शरद पवार म्हणाले, पंजाबमध्ये वेगळं चित्र बघायला मिळत आहे. पंजाबमध्ये जे चित्र आहे ते भाजपला अनुकूल असून काँग्रेसला झटका देणारं आहे. आप या आलिकडे तयार झालेल्या राजकीय पक्षानं दिल्लीत ज्या पद्धतीनं विजय संपादन केला आणि प्रशासन दिलं त्याची प्रतिमा दिल्लीच्या सर्वसामान्य लोकांच्या मनात आहे. पंजाब या सीमेवरील राज्यात दिल्लीच्या कामाचा परिणाम झाल्याचं स्पष्ट दिसत आहे. पंजाब सोडला तर बाकीच्या ठिकाणी जे पक्ष सध्या सत्तेत आहेत त्यांनाच पुन्हा समर्थन देण्याची भूमिका त्या त्या राज्यातील जनतेनं घेतली, त्यामुळं पुन्हा एकदा भाजपचं राज्य प्रस्थापित झालं आहे.

पंजाबमधील काँग्रेसच्या पराभवाचं सांगितलं कारण

पंजाबमध्ये एकेकाळी काँग्रेसची स्थती चांगली होती, पण पक्षांतर्गत जे निर्णय घेतले गेले त्याचा स्विकार पंजाबच्या जनतेनं केला नाही. अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वातील सरकार असताना त्यांना पदावरुन हटवण्यात आलं. त्यानंतर नवं नेतृत्व आलं पण लोकांना काँग्रेसचा हा निर्णय रुचलेला दिसत नाही. यानिर्णयानंतर काँग्रेसमधील एक प्रभावशाली नेते असलेल्या अमरिंदर सिंग यांनी वेगळा पक्ष स्थापन केला आणि ज्या लोकांकडे देशाची सत्ता आहे त्यांच्यासोबत नातं ठेवण्याचा प्रयत्न केला, पण तेही पंजाबच्या लोकांना पटलेलं दिसत नाही. पंजाबची स्थिती वेगळी होती हे मी यासाठी बोलतो कारण पंजाबमध्ये कृषी कायद्यांविरोधात जे आंदोलन झालं यामध्ये सर्वाधिक आंदोलक हे पंजाबमधील होते. पंजाबमधील शेतकऱ्यांच्या मनात जो राग होता. तो या निवडणुकीत दिसून आला. त्यामुळं तिथं लोकांनी भाजपला आणि काँग्रेसला हारवलं. तर एका नव्या पक्षाच्या हाती सत्ता दिली आहे. केजरीवाल यांचं दिल्लीचं जे सरकार आहे. या सरकारबद्दल दिल्लीच्या सामान्य माणसाची मतं जाणून घेतली तर ती केजरीवालांच्या पक्षाच्या बाजूची असतात, असं शरद पवार यांनी आपच्या विजयामागचं कारणंही सांगितलं.

Web Title: Sharad Pawar Comment On Results Of Five States Assembly Elction Appreciated Aam Aadmi Party

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..