योगींची टीम पूर्वीपेक्षा वेगळी दिसणार; ४५ मंत्री शपथ घेण्याची शक्यता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Yogi Adityanath

योगींची टीम पूर्वीपेक्षा वेगळी दिसणार; ४५ मंत्री शपथ घेण्याची शक्यता

योगी आदित्यनाथ (Yogi adityanath) यांच्या मंत्रिमंडळात समावेश करण्यात येणाऱ्या चेहऱ्यांच्या निवडीबाबत भाजपमध्ये मंथन सुरू आहे. २५ मार्च रोजी दुपारी ४ वाजता अटलबिहारी वाजपेयी एकाना इंटरनॅशनल स्टेडियमवर होणाऱ्या भव्य शपथविधी सोहळ्यात योगी यांच्यासह सुमारे ४५ मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. निवडणुकीत विजयी झालेल्या २५५ पैकी सुमारे १२५ आमदारांचा पूल तयार करण्यात आला आहे.

उत्तर प्रदेशची (uttar pradesh) निवडणूक जिंकल्यानंतर भाजप मिशन-२०२४ साठी खूप उत्सुक आहे. पक्षानेही या अभियानाची तयारी सुरू केली आहे. योगी मंत्रिमंडळाची निवड हा देखील याचा एक भाग आहे. काही चेहरे हे राज्य नेतृत्वाची निवड आहेत, तर काही दिल्ली दरबाराला कोणत्याही किंमतीत सरकारमध्ये हवे आहेत. निवडलेल्या १२५ आमदारांपैकी दिल्लीत विचारमंथन करून सुमारे ७० नावांवर एकमत झाले आहे. या नावांमधून सुमारे ४५ चेहऱ्यांची निवड केली जाणार आहे, अशी माहिती पक्षाच्या सूत्रांनी दिली.

हेही वाचा: भाजप मोदींना दोन तासही झोपू देणार नाही; संजय राऊतांचा टोला

२०१७ च्या तुलनेत पक्षासमोरील परिस्थितीही काहीशी वेगळी आहे. पूर्वीपेक्षा अधिक पर्याय उपलब्ध आहेत. पहिल्या टर्ममध्ये मंत्रिपद मिळालेल्यांचे रिपोर्ट कार्डही नेतृत्वासमोर आहेत. यावेळी प्रशासकीय अनुभव असलेले अनेक चेहरेही आहेत. डॉक्टर, इंजिनीअर, प्रोफेशनल्सचेही पर्याय आहेत. नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) कठोर भूमिकेनंतर पक्षाच्या नेत्यांना, खासदार-आमदारांच्या पोरांनाही मंत्रीपद मिळणे शक्य नाही. टीम योगीमध्ये (Yogi adityanath) चांगल्या प्रतिमेच्या चेहऱ्यांना स्थान देण्यावर भर आहे. यावेळी टीम योगी पूर्वीपेक्षा पूर्णपणे वेगळी दिसणार असल्याचे मानले जात आहे.

धामी मॉडेलने आशा उंचावल्या

योगी मंत्रिमंडळात (Yogi adityanath) सामील होणाऱ्या चेहऱ्यांची सध्या सर्वाधिक चर्चा आहे. त्यामुळे लखनौपासून दिल्लीपर्यंत मंथन आणि प्रयत्न सुरू आहेत. यामुळे धामी मॉडेल उत्तर प्रदेशमध्येही लागू होणार का, असा प्रश्न राज्यातील राजकीय वर्तुळात रंगू लागला आहे. या मॉडेलने अनेक मंत्री व निकटवर्तीयांच्या आशाही उंचावल्या आहेत.

Web Title: Yogi Adityanath 45 Ministers Likely To Be Sworn In Dhami Model Raised Hopes Uttar Pradesh

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top