Ganesh Festival : मोरया मोरया गणपत्ती बाप्पा मोरया

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 सप्टेंबर 2018

नागपूर - वाद्यवृंद, ढोल-ताशे, गुलालाची उधळण, फटाक्‍यांची आतषबाजी आणि ‘गणपत्ती बाप्पा मोरया’च्या जयघोषात गणरायाचे आज थाटात आगमन झाले. गुरुवारी सकाळपासूनच शहरात भक्ती आणि उत्साहाचे वातावरण होते. रस्ते गर्दीने फुलून गेले होते. सार्वजनिक मंडळ आणि घरोघरी भक्तिभावाने बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना झाली. 

बाप्पाला घरी आणण्यासाठी सकाळपासून उत्साह संचारला होता. कोणी डोक्‍यावर तर कोणी कारमध्ये बाप्पाला घरी घेऊन गेले. सार्वजनिक मंडळातर्फे ढोल-ताशांच्या निनादात मिरवणुकीने गणेशाचे शहरातील वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये आगमन झाले. पूजा, अर्चना, आरती, पारंपरिक वाद्यांचा गजर, फटाक्‍यांची आतषबाजी अशा भावपूर्ण आणि मंगलमय वातावरणात गणरायांचे स्वागत करण्यात आले. प्रामुख्याने महाल चितारओळीतून मोठ्या प्रमाणात मिरवणूक निघत असल्याने भाविकांच्या सुरक्षितेसाठी पोलिसांचा मोठा ताफा ठिकठिकाणी ठेवण्यात आला होता. वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी काही मार्ग वळवण्यात आले होते. रस्त्यांवर रांगोळ्या, फुलांची उधळण, शामियाना टाकून गणेशभक्तांनी गणरायाचे स्वागत केले. गणरायाच्या आगमनामुळे बाजारपेठाही सजल्या होत्या. पूजेचे साहित्य, आरास, दिव्यांच्या माळा, केळीची पाणे, झेंडूची फुले, आकर्षक विद्युत दिव्यांनी महाल, सक्करदरा, मानेवाडा, बर्डी, खामला, हुडकेश्‍वर, तुकडोजी चौक आदी बाजारपेठा सजल्या होत्या.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganesh Festival Ganeshotsav 2018