नागपूर - शहरात आज दोन लाखांवर गणेशमूर्तींची स्थापना करण्यात आली असून हजारो भाविक दीड दिवसाचा उत्सव साजरा करतात. उद्या, दीड दिवसाच्या गणेशमूर्तींचे विसर्जन होणार असून महापालिकेने यासाठीही तयारी पूर्ण केली. दहाही झोनमध्ये विसर्जनासाठी दीडशे रबर टॅंकची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली अनंत चतुर्दशीला ही संख्या २४७ वर पोहोचणार आहे.
शहरातही मोठ्या प्रमाणात नागरिक दीड दिवसाचा गणेशोत्सव साजरा करतात.

आज अनेकांनी गणेशमूर्तीची स्थापना केली असून उद्या विसर्जन करणार आहेत. विसर्जनाची लगबग बघता शहरातील तलावांभोवती तटबंदी उभारण्यात आली आहे. तलाव प्रदूषित होऊ नये, यासाठी गेल्या सात वर्षांपासून नागपुरात विसर्जनासाठी कृत्रिम तलाव, टँकची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.
उद्या विसर्जनासाठी दहाही झोनमध्ये १५० टँक उपलब्ध असल्याचे महापालिकेचे आरोग्य अधिकारी स्वच्छता डॉ. प्रदीप दासरवार यांनी स्पष्ट केले. अनंत चतुर्दशीला २४७ टँक, तलावांची सोय करण्यात येणार आहे. पाचव्या दिवसापासून तलावाच्या संख्येत वाढ केली जाणार आहे.
वस्ती, चौकांसह तलाव परिसरातही कृत्रिम टँक, तलाव उपलब्ध राहणार असल्याचे ते म्हणाले. महापालिकेने उभारलेले कृत्रिम टँक, तलाव शहराच्या काही भागात दृष्टीस पडत आहे. प्लायवूडद्वारे मोठे कृत्रिम तलाव निर्माण करणारे विजय लिमये यांनीही यंदा मागणी वाढल्याचे नमूद करीत दोन टँक रामनगर मैदानात उपलब्ध असल्याचे सांगितले.
पहिल्याच दिवशी टॅंक उपलब्ध
गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी मोठ्या प्रमाणात महिला गौरी विसर्जन करतात. त्यामुळे महापालिकेने गांधीसागर तलाव परिसरात पाच तर फुटाळा तलाव परिसरात दोन टँक पहिल्याच दिवशी उपलब्ध करून दिल्याचे डॉ. दासरवार म्हणाले.