दारू उधार मागितली म्हणून केला युवकाचा खून  

अनिल कांबळे
Sunday, 20 September 2020

गोलूच्या आईला दारू उधार मागितली. मात्र, तिने दारू देण्यास नकार दिला. त्यामुळे सुबोधने शिवीगाळ केली. रात्री आठच्या सुमारास गोलू घरी आला. त्याला आईने सुबोधने शिवीगाळ केल्याबाबत माहिती दिली. 

नागपूर : दारूच्या वादातून युवकाचा तलवारीने भोसकून खून करण्यात आला. ही थरारक घटना शुक्रवारी माजरी गावात घडली. सुबोध ऊर्फ बापू विशाल मेश्राम (वय २२, रा. पाटील ले-आउट, माजरी) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी यशोधरानगर पोलिसांनी प्रणय ऊर्फ गोलू राऊत (वय २२), सागर परिमल (वय २०) आणि अभिषेक चौधरी (सर्व रा. माजरी) यांना अटक केली. 

प्रणय हा कॅटरिंगचे काम करीत होता. पण, लॉकडाउननंतर त्याचा रोजगार गेला. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी तो अवैधपणे देशी दारू विकत होता. सुबोध प्रणयकडे दारू प्यायला यायचा. त्याच्यावर जवळपास हजार रुपये उधार होते. शुक्रवारी सायंकाळी त्याने गोलूच्या आईला दारू उधार मागितली. मात्र, तिने दारू देण्यास नकार दिला. त्यामुळे सुबोधने शिवीगाळ केली. रात्री आठच्या सुमारास गोलू घरी आला. त्याला आईने सुबोधने शिवीगाळ केल्याबाबत माहिती दिली. 

हेही वाचा : निसर्गाच्या कुशीत वसलेले डोंगरावरचे गाव

शुक्रवारी रात्री १२.३० ते १.२० च्या सुमारास आरोपी सुबोधच्या घरी गेले. त्याला फोन करून बाहेर बोलावले. त्याला माजरी परिसरातील एम्ब्रॉयडरी कारखान्याजवळ नेले व पैशाची मागणी केली. त्याने नकार दिला असता दोघांमध्ये वाद झाला. आरोपींनी चाकूने सुबोधच्या मानेवर वार करून खून केला. माहिती मिळताच यशोधरानगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रमाकांत दुर्गे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. आरोपींना अटक करण्यात आली आहे. 

संपादन : मेघराज मेश्राम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title:   Murder of youth