
जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या १,५३५ शाळा आहेत. पूर्वी या शाळांची संख्या १५५१ होती. २०१८ मध्ये पटसंख्येअभावी १६ शाळा बंद केल्या. आता आणखी कमी पटसंख्येच्या तसेच एक किलोमीटरच्या परिसरात दोन शाळा असलेल्यांपैकी एक शाळा बंद करून संबंधित शाळेतील विद्यार्थ्यांचे दुसऱ्या शाळेत समायोजन करण्यात येणार आहे.
नागपूर : राज्य शासनाने २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचे धोरण आखले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या आणखी १३ शाळा बंद करण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाने तयार केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली.
हेही वाचा - बापरे! मुख्याध्यापिकेसह १६ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण, शाळा बंद
जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या १,५३५ शाळा आहेत. पूर्वी या शाळांची संख्या १५५१ होती. २०१८ मध्ये पटसंख्येअभावी १६ शाळा बंद केल्या. आता आणखी कमी पटसंख्येच्या तसेच एक किलोमीटरच्या परिसरात दोन शाळा असलेल्यांपैकी एक शाळा बंद करून संबंधित शाळेतील विद्यार्थ्यांचे दुसऱ्या शाळेत समायोजन करण्यात येणार आहे. जि.प.च्या शाळांची पटसंख्या वाढावी, यासाठी शासनस्तरावरून विविध कार्यक्रम राबविण्यात येतात. तसेच शाळांमध्ये विद्यार्थी टिकून राहावे, यासाठी विद्यार्थ्यांना गणवेशापासून ते पाठ्यपुस्तक व मध्यान्ह भोजन आदी सुविधा पुरविण्याता येते. मात्र, त्यानंतरही जि.प.च्या शाळांची पटसंख्या वाढत नसल्याचे दिसते. असलेली पटसंख्याही आता दिवसेंदिवस कमी होत असल्याचे चित्र आहे. दोन वर्षांपूर्वी राज्यात १३०० शाळा बंद करण्यात आल्या. त्यामध्ये नागपूर जि.प.च्या १६ वर शाळांचा समावेश होता. आता नव्याने १६ शाळा बंद करण्याचा प्रस्ताव तयार केला. उमरेड तालुक्यातील दोन शाळांचे अंतर एक किलोमीटरपेक्षा अधिक होते. तर कुही तालुक्यातील एक शाळा यापूर्वीच बंद केल्याने या तीन शाळा वगळून १३ शाळा समायोजित करण्यात येतील.
हेही वाचा - राकेश टिकैत यांना पोलिस अधीक्षकांच्या नावाने 'फेक कॉल', अखेर यवतमाळातील सभा...
या शाळांचे होणार समायोजन -
तालुका | मूळ शाळा | समायोजित करावयाच्या शाळेचे नाव |
कामठी | प्राथ.शाळा भूगाव क्र.२ | प्राथ. शाळा भूगाव क्र. १ |
कामठी | प्राथ. शाळा येरखेडा | प्राथ. शाळा मरारटोली |
नागपूर | प्राथ. शाळा वाडी क्र. २ | प्राथ. शाळा वाडी क्र. १ |
काटोल | प्राथ. शाळा कचारीसावंगा क्र.१ | प्राथ. शाळा कचारी सावंगा (पुनर्वसन) |
काटोल | प्राथ. शाळा पारडसिंगा | प्राथ. शाळा वडविहिरा |
नरखेड | प्राथ. शाळा बेलोना क्र.१ | प्राथ. शाळा बेलोना क्र. २ |
नरखेड | प्राथ. शाळा खैरगाव क्र.२ | प्राथ. शाळा खैरगाव क्र. १ |
सावनेर | प्राथ. शाळा वलनी क्र. १ | प्राथ. शाळा वलनी क्र. २ |
सावनेर | प्राथ. शाळा सिल्लेवाडा क्र. १ | प्राथ. शाळा सिल्लेवाडा क्र. २ |
भिवापूर | प्राथ. शाळा घाटउमरी (पुनवर्सन) | प्राथ. शाळा गाळेघाट |
मौदा | प्राथ. शाळा तारसा क्र. २ | प्राथ. शाळा तारसा क्र. १ |
हिंगणा | प्राथ. शाळा टाकळघाट क्र. २ | प्राथ. शाळा टाकळघाट क्र. १ |
पारशिवनी | प्राथ. शाळा कोयला खदान क्र. २ | प्राथ. शाळा कोयला खदान क्र. १ |