esakal | महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी भाजप नेता आणि सामाजिक कार्यकर्ता फरार; आरोपींचा शोध सुरु 

बोलून बातमी शोधा

सामाजिक कार्यकर्ता पंजू किसनचंद तोतवानी व इतर तीन आरोपी फरार झाले आहे. फरार आरोपींचा एमआयडीसी पोलिस कसून शोध घेत आहेत.}

सामाजिक कार्यकर्ता पंजू किसनचंद तोतवानी व इतर तीन आरोपी फरार झाले आहे. फरार आरोपींचा एमआयडीसी पोलिस कसून शोध घेत आहेत.

महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी भाजप नेता आणि सामाजिक कार्यकर्ता फरार; आरोपींचा शोध सुरु 
sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर ः भूखंड हडपण्याच्या नादात महिलेचा विनयभंग केल्याच्या प्रकरणात एमआयडीसी पोलिसांनी अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करताच भारतीय जनता पक्षाचा नेता व संघटित बांधकाम कामगार कल्याण महामंडळाचा माजी अध्यक्ष मुन्ना यादव, कथित सामाजिक कार्यकर्ता पंजू किसनचंद तोतवानी व इतर तीन आरोपी फरार झाले आहे. फरार आरोपींचा एमआयडीसी पोलिस कसून शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत महिलेने आरोपींवर दाखल असलेले आजवरचे गुन्हे आणि त्यांची संघटीत गुन्हेगारी लक्षात घेता मोक्काचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. सदर पीडीत महिला ही अनुसूचित जाती प्रवर्गात मोडते. आरोपींनी तिच्या ताब्यातील भुखंड बळकावण्यासाठी अश्लिल शिवीगाळ करुन दबाव टाकला आणि तिला धमकी दिली. 

दुर्दैवी! पोटच्या मुलाच्या मांडीवरच आईनं सोडला प्राण; काटोल नाक्याजवळ झाला भीषण अपघात 

याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी मुन्ना यादव, पंजू तोतवानीसह अन्य आरोपींविरुद्ध अ‍ॅट्रोसिटीसह विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहे. त्यामुळे पोलिसांकडून कारवाईचा आवळता फास बघता आरोपी मुन्ना यादव, पंजू तोतवानी यांच्यासह पाचही आरोपी फरार झाले आहेत. राजवीर यादव, गणेश यादव, प्रॉपर्टी डिलर प्रमोद डोंगरे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या अन्य आरोपींची नावे आहेत. तक्रारदार ४० वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. 

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नेत्या नूतन रेवतकर आणि मनपातील माजी सत्तापक्ष नेता वेदप्रकाश आर्य यांनी सुद्धा मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे केली आहे.

उपराजधानीत कोरोना लसीकरणासाठी ज्येष्ठ नागरिकांत उत्साह; पहिल्याच दिवशी ४४० जणांनी घेतली लस 

व्हॉट्सअपवरुन दिल्या धमक्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रमोद डोंगरे हा प्रॉपर्टी डिलर आहे. पीडित महिलेने प्रमोद यांच्यासोबत पांडुरंगनगर येथील भूखंड १२ लाखांमध्ये खरेदीचा व्यवहार केला. प्रमोदने महिलेऐवजी भूखंडाचे विक्रीपत्र मुन्ना यादवचा पंटर राजवीर यादव याला करुन दिले. मुन्ना यादव याने पंजू तोतवानीला त्या महिलेला धडा शिकविण्यास सांगितले. पंजू तोतवानीने व्हॉट्सअपवरुन तक्रार परत घेण्यासाठी दबाब टाकल्याचा पीडित महिलेचा आरोप आहे. 

संपादन - अथर्व महांकाळ