राज्यातील सतरा 'टायगर अभी जिंदा नही हैं' 

17 tigers killed in the state
17 tigers killed in the state

नागपूर : राज्यातील वाघांची संख्या वाढली असताना, गेल्या वर्षभरात 17 वाघांचा मृत्यू झाला आहे. त्यात अपघातात मृत पावलेल्या वाघांची संख्या अधिक आहे. ही संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी आहे. वन विभागाकडून संरक्षण आणि संवर्धनाकडे विशेष लक्ष दिले जात असल्याने हे शक्‍य झाले आहे.

यंदा झालेल्या गणनेत राज्यात वाघांच्या संख्येत 30 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. मराठवाड्यासारख्या परिसरात तब्बल 40 वर्षांनी वाघ दिसू लागला आहे. वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी वाघासह तृणभक्षक प्राण्यांच्या संवर्धनाकडे विशेष लक्ष देत असल्यानेच हे शक्‍य झाले आहे. असे असले तरी, आपत्कालीन स्थितीत वाघाला वाचविण्याची क्षमता वाढविण्यासाठी प्रशिक्षित वनाधिकाऱ्यांची कमी जाणवल्याचे बोलले जात आहे. 

चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक नऊ, अमरावती आणि नागपूर जिल्ह्यात प्रत्येकी तीन वाघ दगावलेत. यवतमाळ आणि भंडारा या जिल्ह्यात प्रत्येकी एका वाघाचा मृत्यू झाला आहे. त्यातील सहा वाघांची शिकार झालेली आहे, हेही चिंता वाढविणारे आहे. आठ वाघांचा मृत्यू नैसर्गिक झालेला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्‍यात सिरना नदीतील दगडाच्या कपारीत अडकलेल्या वाघाच्या मृत्यूने ही हतबलता आणखी ठळकपणे समोर आली आहे. तसेच रामटेक जिल्ह्यात खाणीमध्ये पडून एका वाघाचा मृत्यू झाला आहे.

मानव-वन्यजीव संघर्षात वन्यजीवप्रेमींच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या परिसरातील नागरिकांनी वाघाच्या मृत्यूसाठी वनखात्यावर दोषारोप केले आहे. वाइल्ड लाइफ प्रोटेक्‍शन सोसायटी ऑफ इंडियाने दिलेल्या आकडेवारीत राज्यात 19 वाघांचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. मात्र, त्याची नेमकी माहिती दिलेली नाही. देशात वर्षभरात 110 वाघ आणि 491 बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. 

वाघांच्या मृत्यूत पाचने घट

2018 मध्ये 104 वाघांचा मृत्यू झाला होता. मृत्यू होणाऱ्या वाघांच्या तुलनेत फक्त सहाचीच वाढ झालेली आहे. राज्यात गेल्या वर्षी 22 वाघ मरण पावले होते. त्यात यंदा मृत्यू होणाऱ्या वाघांच्या संख्येत पाचने कमी झालेली आहे. मध्य प्रदेशात सर्वाधिक 23 आणि त्यापाठोपाठ महाराष्ट्रात 17 वाघ मरण पावल्याने देशात राज्याचा दुसरा क्रमांक आहे. 

वर्ष वाघांचा मृत्यू 
2015 14 
2016 16 
2017 22 
2018 22 
2019 19

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com