रेल्वेकडून प्रवाशांना दिलासा, दिला एवढ्या कोटींचा परतावा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जून 2020

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर 25 मार्चपासून प्रवासी रेल्वेवाहतूक थांबविण्यात आली आहे. पूर्वीच तिकीट घेणाऱ्या प्रवाशांना तिकिटांचा पूर्ण परतावा देण्याची घोषणा रेल्वे मंत्रालयाने केली होती. त्यानुसार 22 मेपासून पैसे परत देण्यास सुरुवात करण्यात आली. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या तिन्ही विभागांमधील आरक्षण केंद्रांवरून तिकीट रद्द करून पैसे परत दिले जात आहे. सहा महिन्यांपर्यंत तिकीट रद्द करता येणार असले तरी अनेकांनी शक्‍य तितक्‍या लवकर तिकीट रद्द करण्याचा प्रयत्न चालविला आहे.

नागपूर : भारतीय रेल्वेकडून लॉकडाऊनदरम्यान रद्द करण्यात आलेल्या प्रवासी रेल्वेगाड्यांचे तिकीट रद्द करून प्रवाशांना परतावा दिला जात आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने महिनाभराच्या काळात एकूण 2 लाख 96 हजार तिकीट रद्द करून 19 कोटी 33 लाख 74 हजार 888 रुपयांचा परतावा दिला आहे. नागपूर विभागानेही महिनाभरात 3.85 कोटी रुपये प्रवाशांना परत केले आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर 25 मार्चपासून प्रवासी रेल्वेवाहतूक थांबविण्यात आली आहे. पूर्वीच तिकीट घेणाऱ्या प्रवाशांना तिकिटांचा पूर्ण परतावा देण्याची घोषणा रेल्वे मंत्रालयाने केली होती. त्यानुसार 22 मेपासून पैसे परत देण्यास सुरुवात करण्यात आली. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या तिन्ही विभागांमधील आरक्षण केंद्रांवरून तिकीट रद्द करून पैसे परत दिले जात आहे. सहा महिन्यांपर्यंत तिकीट रद्द करता येणार असले तरी अनेकांनी शक्‍य तितक्‍या लवकर तिकीट रद्द करण्याचा प्रयत्न चालविला आहे.

अवश्य वाचा- हुंडाबळी! सुनेपेक्षा कार झाली मोठी, शारीरिक व मानसिक त्रास अन्‌...

एक महिन्याच्या काळात आरक्षण केंद्रांवरून 2 लाख 79 हजार 178 प्रवाशांनी तिकीट रद्द केले. त्यांना 18 कोटी 8 लाख 50 हजार 320 रुपयांचा परतावा देण्यात आला. शिवाय ऑनलाईन पद्धतीने 17 हजार 750 प्रवाशांनी ई-तिकीट रद्द केले. त्यांना 1 कोटी25 लाख 25 हजार 253 रुपये परत करण्यात आले. नागपूर विभागातील विविध रेल्वेस्थानकांवर असणाऱ्या तिकीट आरक्षण केंद्रावरून 23 हजार टिकट रद्द करण्यात आले. प्रवाशांना 3 कोटी 85 लाखांचा परतावा देण्यात आला. कोरोनाच संसर्ग टाळण्यासाठी संपूर्ण प्रक्रिया भौतिक अंतराच्या नियमांचे पालन करून पार पाडली जात आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 19.33 crore refund to passengers from railway department