हुंडाबळी! सुनेपेक्षा कार झाली मोठी, शारीरिक व मानसिक त्रास अन्‌...

Newlywed commits suicide in Nagpur
Newlywed commits suicide in Nagpur

नागपूर : आपण 21व्या शतकात वावरत आहोत. येथे स्त्री आणि पुरुष दोघेही समान आहेत. त्यांना समान वागणूक दिली जाते. मोठमोठ्या पदांवर महिला कार्यरत आहेत. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कामही करीत आहेत. आजची स्त्री पुरुषापेक्षा कमी नाही, असा समज सर्वांचा झाला आहे. यामुळे त्यांना पाहिजे तसा मान मिळत आहे. हे झाले नोकरीपेशा महिलांचे... परंतु, ज्या नोकरी करीत नाही तसेच कमी शिकलेल्या आहेत त्यांचे काय? त्यांच्या जिवनात काहीही बदल झालेला नाही. असाच एक प्रकार नुकताच अडघकीस आला आहे. 

पूर्वी लग्न करताना मुलीच्या कुटुंबीयांना हुंडा मागितला जात होता. मुलाच्या शिक्षणावरून हुंडा ठरत होता. मुलगा जितका जास्त शिकलेला तितका हुंडा जास्त मिळत होता. त्यामुळे मुलांचे भाव वाढलेले असायचे. आता मात्र जमाना बदललेला आहे. त्यामुळे हुंडा मागितला जात नाही. हे मात्र मोचक्‍याच ठिकाणी, हे विशेष... हुंड्यासाठी नवविवाहितेचा छळ आणि त्यातून होणाऱ्या आत्महत्यांच्या बातम्या आपण आजही ऐकतो आणि पाहतो. यात मात्र कोणताही बदल झालेला नाही. यामुळे मुलांच्या कार्यश्रमतेवर प्रश्‍नचिन्ह झाल्याशिवाय राहत नाही. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरिता संदीप नागाचारी (वय 24) ही मुळची बालाघाट, छत्तीसगड येथील रहिवासी आहे. तिचा डिसेंबर 2019 मध्ये संदीप नागाचारी (वय 32) याच्यासोबत विवाह झाला होता. काही दिवस सुखी संसाराचे काढल्यानंतर सासरच्या मंडळीकडून कोणत्या ना कोणत्या कारणाने त्रास देणे सुरू झाले. तीही ती सासरच्या मंडळींचा त्रास सहन करीत होती. 

मात्र, ऐकेदिवशी चक्‍क कार खरेदी करण्यासाठी सरितावर माहेरून पैसे आणण्याचा दबाव टाकण्यात आला. मात्र, माहेरची परिस्थिती चांगली नसल्याने तिने स्पष्ट नकार दिला. यामुळे चिडलेला पती व सासू यांनी सरिताचा छळ सुरू केला. तरीही तिने ही गोष्ट माहेरी पोहोचू दिली नाही. घरच्यांना त्रास कशाला द्यायचा या विचारातून ती गप्प होती. दुसरीकडे हुंड्यासाठी छळ वाढतच होता.

सतत होणारा छळ असह्य झाल्याने सरिताने 20 जून रोजी गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. तपासादरम्यान हुंड्यासाठी छळ होत असल्याने सरिता यांनी आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पाचपावली पोलिसांनी सरिता यांचे पती संदीप नागाचारी (वय 32) व सासू रत्ना सुशील नागाचारी (वय 60, दोन्ही रा. मोतीबाग) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

सहा महिन्यांपासून छळ

सरिताचे सहा महिन्यापूर्वीच लग्न झाले होते. काही दिवस चांगले गेल्यानंतर सासरच्या मंडळींनी तिचा हुंड्यासाठी छळ करायला सुरुवात केली. सरितावर कार घेण्यासाठी माहेरून पैसे आणण्यासाठी दबाव टाकण्यात येत होता. यासाठी तिचा शारीरिक व मानसिक छळ केला जात होता. सतत होणाऱ्या छळाला कंटाळून सहा महिन्यांपूर्वीच लग्न झालेल्या सरिताने गळफास लावून आत्महत्या केली. सरिताव्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पती व सासूविरुद्ध पाचपावली पोलिस ठाण्यात हुंडाबळीचा गुन्हा दाखल केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com