50 वर्षीय महिलेवर जडले 20 वर्षीय युवकाचे प्रेम, पहाटे घरात घुसून केली ही मागणी... 

अनिल कांबळे 
सोमवार, 15 जून 2020

पीडित 50 वर्षीय महिला अंबाझरीत राहते. घरी एकटीच असल्याने ती काही साहित्य आणणे किंवा घरगुती कामासाठी वस्तीतील मुलांची मदत घेते. परंतु, आरोपी बादल निस्वार (वय 20) हा महिलेच्या मागे-पुढे करीत होता.

नागपूर : वस्तीत राहणाऱ्या 50 वर्षीय महिलेवर एका 20 वर्षीय युवकाचे एकतर्फी प्रेम जडले. त्या महिलेच्या मागे-पुढे फिरून महिलेला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न तो करायचा. महिलेचा पाठलाग करून तिला मदत करण्याच्या नावावर प्रेम व्यक्‍त करीत होता. अचानक पहाटेच्या सुमारास तो युवक महिलेच्या घरात शिरला आणि तिला चुंबनाची मागणी केली. महिलेने घरातील झाडू काढून धुलाई करणे सुरू केले. युवकाने मार खाता खाताच पळ काढला. ही घटना अंबाझरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. 

हेही वाचा - खाकी वर्दीतील लव्हबर्डची चर्चा जोरात, वरिष्ठांपर्यंत पोहोचले प्रकरण अन्...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित 50 वर्षीय महिला अंबाझरीत राहते. घरी एकटीच असल्याने ती काही साहित्य आणणे किंवा घरगुती कामासाठी वस्तीतील मुलांची मदत घेते. परंतु, आरोपी बादल निस्वार (वय 20) हा महिलेच्या मागे-पुढे करीत होता. तिला नेहमी मदत करीत होता. घरात एकटी असलेल्या महिलेला बघून तो महिलेकडे आकर्षित झाला. तिच्यावर एकतर्फी प्रेम करायला लागला. त्यामुळे तो नेमही तिच्या घराजवळ बसत होता. काही काम असल्यास तो लगेच धावत महिलेकडे जात होता. बादलचे त्या महिलेप्रती प्रेम वाढायला लागले. 

13 जून रोजी पहाटे चार वाजताच्या सुमारास बादल भिंतीवरून उडी मारून महिलेच्या घरी गेला. त्याने घरात प्रवेश करीत महिलेला झोपेतून उठवले. तिला प्रेम करीत असल्याची कबुली देत चुंबन देण्याची मागणी केली. बादलने घरात प्रवेश केल्याने चिडलेल्या महिलेने सर्वप्रथम झाडू हातात घेतला आणि त्याला बदडणे सुरू केले. यादरम्यान आजूबाजूचे लोक उठण्यापूर्वीच बादलने घरातून पळ काढला. सकाळ होताच महिलेने अंबाझरी पोलिस स्टेशन गाठले आणि बादलविरुद्ध रितसर तक्रार दिली. या प्रकरणी अंबाझरी पोलिसांनी तक्रारीवरून बादलविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A 20-years young man falls in love with a 50-year-old woman