esakal | खाकी वर्दीतील लव्हबर्डची चर्चा जोरात, वरिष्ठांपर्यंत पोहोचले प्रकरण अन्...
sakal

बोलून बातमी शोधा

love story of nagpur cop

पत्नीने प्रेयसीला सर्वांसमोर मारहाण केल्यामुळे योगेशला चिड आली. त्याने घरी गेल्यानंतर मलायकला जबर मारहाण केली. त्यानंतर मलायकला तो घरीसुद्धा आणायला लागला. मलायकाला पती आणि वृषाली दोघेही वर्दीची भीती दाखवून घाबरवायला लागले. होत असलेल्या मारहाणीला कंटाळून मलायकाने 2016 मध्ये पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. तक्रारीवरून घरगुती हिंसाचाराबाबत योगेशसह अन्य चौघांवर गुन्हे दाखल झाले.

खाकी वर्दीतील लव्हबर्डची चर्चा जोरात, वरिष्ठांपर्यंत पोहोचले प्रकरण अन्...

sakal_logo
By
ANIL KAMBLE

नागपूर : पोलिस ठाण्यात कार्यरत असताना एकाच शिफ्टमध्ये ड्युटीवर असताना दोघांची मैत्री झाली. अंगावरील खाकीचे भान विसरून दोघांचे प्रेमसंबंध प्रस्थापित केले. विवाहित असूनही दोघांचेही प्रेम फुलले. मात्र, त्यांच्या प्रेमाची कुणकुण पत्नीला लागली, तिने पाळत ठेवल्यानंतर दोघांना रंगेहात पकडले.

त्यानंतर पत्नीने पतीसह त्याच्या प्रेयसीची वरिष्ठांकडे तक्रार केली. एका चित्रपटाला शोभेल असे कथानक नागपूर शहर पोलिस दलात घडले. योगेश (वय 35) आणि वृषाली (वय 30) असे या प्रेमी युगुलाचे नाव आहे.

अजनी पोलिस ठाण्यात जुळले तार

योगेश हा हुडकेश्‍वरमध्ये राहतो तर वृषाली पोलिस वसाहतीत राहते. दोघेही 2016 मध्ये झोन चारमधील एका पोलिस ठाण्यात ड्युटीवर होते. दोघांचीही एकाच पथकात ड्युटी असल्यामुळे सोबतच काम सुरू होते. दरम्यान दोघांची मैत्री झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले. त्यावेळी योगेश हा विवाहित होता तर वृषाली अविवाहित होती. त्यामुळे दोघांची पोलिस ठाण्यातही चर्चा होती. ती कुणकुण पत्नी मलायका हिच्यापर्यंत पोहचली. त्यामुळे तिने पती योगेशसोबत चर्चा केली आणि वृषालीला घरी बोलविण्याचा तगादा लावला. मात्र, त्यावेळी त्याने प्रेमसंबंध असल्याबाबत स्पष्ट नकार दिला. त्यामुळे मलायकाने त्याच्यावर विश्‍वास ठेवला.

फुटाळ्यावर फुलले प्रेम

त्यावेळी मलायकाने वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची भेट घेऊन दोघांच्या ड्युटी वेगवेगळ्या लावण्याची विनंती केली. काही महिन्यांचा काळ लोटल्यानंतर दोघांनाही एकमेकांचा विरह सहन होत नव्हता. त्यामुळे त्या दोघांनी बाहेर भेटून एकमेकांशी प्रेमसंबंध पूर्वरत सुरू ठेवले. यादरम्यान एका "लव्हर स्पॉट'वर हे दोघे फिरायला गेले असता पत्नी मलाकाला सापडले. त्यामुळे तेथेच मलायकाने दोघांचीही कानउघडणी केली तर वृषालीला चांगला चोपही दिला होता.
 
प्रेयसीला मारहाणीमुळे आली चीड

पत्नीने प्रेयसीला सर्वांसमोर मारहाण केल्यामुळे योगेशला चिड आली. त्याने घरी गेल्यानंतर मलायकला जबर मारहाण केली. त्यानंतर मलायकला तो घरीसुद्धा आणायला लागला. मलायकाला पती आणि वृषाली दोघेही वर्दीची भीती दाखवून घाबरवायला लागले. होत असलेल्या मारहाणीला कंटाळून मलायकाने 2016 मध्ये पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. तक्रारीवरून घरगुती हिंसाचाराबाबत योगेशसह अन्य चौघांवर गुन्हे दाखल झाले.
 
फुटाळा भेटीने केला घोळ

योगेश आणि वृषालीतील प्रेमसंबंध एवढे वाढले की, दोघेही सोबत चित्रपट बघायला, लॉंग ड्राईव्हला तर कधी फुटाळ्यावर तासन् तास बसत होते. योगेश हा वृषालीसह फुटाळ्यावर बसलेला असल्याची माहिती एका महिला पोलिस कर्मचाऱ्याने मलायकाला दिली. ती लगेच फुटाळ्यावर पोहचली. त्यावेळी तलावाच्या काठावर पाण्याकडे पाय ठेवून दोघेही हातात हात घेऊन गप्पा करीत होते. मलायकाने दोघांनाही हिसका दाखवला. वृषालीला कानशिलात लगावली. या भेटीमुळे पोलिस प्रेमी युगुलाच्या प्रेमसंबंधाचा भंडाफोड झाला.

VIDEO - "झुंड' सिनेमाच्या खऱ्या नायकाची "कोरोना'ग्रस्तांसाठी मदत

 
अखेर झाले निलंबित

चार वर्षांपूर्वी पोलिस ठाण्यात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मलायकाने वृषालीसोबत योगेशचे प्रेमसंबंध असून रंगेहात पकडल्याचा दावा केला होता. तसेच या दोघांसह अन्य सदस्यांनीही मारहाण केल्याचा आरोप केला होता. तब्बल चार वर्षांनंतर योगेश आणि वृषालीवर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी निलंबनाची कारवाई केली.