रशियात अडकले 200 भावी डॉक्टर्स, त्यांना भारतात आणा...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 मे 2020

 रशियात 15 विद्यापीठात एमबीबीएस अभ्यासक्रमात शिकणारे नागपुरातील दोनशे विद्यार्थी अडकले असल्याने त्यांना परत आणण्यासाठी राज्य सरकारने पाऊल उचलावे, अशी मागणी या पत्राद्वारे आमदार गजभिये यांनी केली.

नागपूर: जागतिक स्तरावर कोरोनाने थैमान घातले असून, रशियामध्ये परिस्थिती गंभीर आहे. या पार्श्‍वभूमीवरच तिथे एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना सुरक्षित भारतात आणण्यासाठी आमदार प्रकाश गजभिये यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे पत्राद्वारे जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून केली.

रशियामध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी कमी पैसा लागत असल्याने तेथील विद्यापीठांकडे भारतीय विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात ओढा असतो. या विद्यार्थ्यांद्वारे येथील विद्यापीठांमध्ये प्रवेश घेऊन अभ्यासक्रम पूर्ण केला जातो. मात्र, गेल्या चार महिन्यांपासून चीन, अमेरिका, रशिया यासह संपूर्ण युरोपात कोरोनाचे संकट अत्यंत गंभीर झाले आहे. त्यामुळे या परिस्थितीत तेथे अडकलेल्या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न केले जात आहे.

वाचा- लग्नाच्या आधीच वाजला नवरदेवाचा बॅंड, पेंटरने केला व्हाईट वॉश

रशियात 15 विद्यापीठात एमबीबीएस अभ्यासक्रमात शिकणारे नागपुरातील दोनशे विद्यार्थी अडकले असल्याने त्यांना परत आणण्यासाठी राज्य सरकारने पाऊल उचलावे, अशी मागणी या पत्राद्वारे आमदार गजभिये यांनी केली. तसे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले. याशिवाय नागपूर, बुलढाणा, अमरावती, अकोला, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया व भंडारा जिल्ह्यात टाळेबंदीमुळे गैरसोय होणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती आमदार प्रकाश गजभिये यानी गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिली. निवेदन देताना मनोज नागपूरकर, शाहू, अग्रवाल, वाडेकर, तिरपुडे उपस्थित होते.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 200 MBBS stuedens stranded in Russia,demands to bring them back