लग्नाच्या आधीच वाजला नवरदेवाचा बॅंड, पेंटरने केला व्हाईट वॉश... वाचा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 मे 2020

लग्नसमारंभ असल्यामुळे नवरदेवाने घराच्या रंगरंगोटीचे काम सुरू केले. घर सुंदर दिसावे म्हणून लायटींग आणि थोडेफार फर्निचरचेही काम सुरू केले. त्यासाठी वस्तीत राहणाऱ्या दोन युवकांना रंगरंगोटीचे काम करण्यास सांगितले. त्यांनी दोन दिवस प्रामाणिपणे रंगरंगोटी केली. मात्र तिसऱ्या दिवशी नवरदेवाने लग्नात खर्च करण्यासाठी बॅंकेतून काढलेल्या पाच लाखांच्या रकमेवर मजुरांनी हात साफ केला. 

नागपूर : लग्नकार्य म्हटलं तर घरात अनेक प्रकारची तयारी सुरू असते. घरची स्वच्छता, कपडे-दागिने खरेदी, रंगरंगोटी आदी कामांची धामधूम सुरू असते. अशात काही गोष्टींकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. नेमका याच गोष्टीचा फटका नागपुरातील एका कुटुंबाला बसला... वाचा नेमके काय झाले ते...

लग्नसमारंभ असल्यामुळे नवरदेवाने घराच्या रंगरंगोटीचे काम सुरू केले. घर सुंदर दिसावे म्हणून लायटींग आणि थोडेफार फर्निचरचेही काम सुरू केले. त्यासाठी वस्तीत राहणाऱ्या दोन युवकांना रंगरंगोटीचे काम करण्यास सांगितले. त्यांनी दोन दिवस प्रामाणिपणे रंगरंगोटी केली. मात्र तिसऱ्या दिवशी नवरदेवाने लग्नात खर्च करण्यासाठी बॅंकेतून काढलेल्या पाच लाखांच्या रकमेवर मजुरांनी हात साफ केला. 

रंगकाम करताना उडवले 5 लाख 
याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही मजुरांवर गुन्हे दाखल केले असून त्यांना अटक केली. प्रितम प्रकाश आकोडे आणि सुमित किरण वाघमारे अशी चोरट्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार घरमालक अश्विन कवडू सांगोळकर (39) हे जरीपटका हद्दीतील माया नगर येथील प्लॉट नंबर 731, गौतम बौद्ध विहाराजवळ राहतात. ते कोचिंग सेंटर चालवितात. त्यांचे येत्या 27 मे रोजी लग्न आहे.

जंगलात झोपून काढावे लागताहेत दिवस... ऐका नागपुरातील पोलिसाची व्यथा

कोरोनामुळे छोटेखानी लग्न समारंभ पार पाडण्यापूर्वी त्यांनी घर सजविण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी वस्तीतील सुमित रंगारी आणि प्रितम यांना कामाचे कंत्राट दिले. त्यांना दोन पैसे जास्त देऊन लवकरात लवकर काम आटोपण्यास सांगितले. भिंतीला रंग देण्यासाठी एक आलमारी दोघांनी उचलली. त्यामध्ये त्यांना पाच लाखांची रक्‍कम दिसली. त्यांनी सांगोळकर यांच्या घरातील लोखंडी आलमारीतील बॅगमध्ये ठेवलेले 5 लाख रुपये चोरले.

सायंकाळच्या सुमारास एका मजुराला पैसे देण्यासाठी अश्‍विन यांनी आलमारी उघडली असता त्यांना बॅग दिसून आली नाही. बॅग लंपास झाल्याचे लक्षात येताच नवरदेवाने डोक्‍यावर हात मारला. याप्रकरणी फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी दोन्ही आरोपीविरूद्ध गुन्हा नोंदविला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: painter looted cash from grooms home