हृदयद्रावक! पोहण्याचा आवरला नाही मोह म्हणून उतरले पाण्यात आणि काळाने केला घात  

मनोज खुटाटे 
Thursday, 3 September 2020

काठावरील महादेव मंदिरात दररोज पूजा करायला जायचा. सकाळी ७.३० वाजता दरम्यान तो महादेव मंदिरातील मूर्तींची पूजा करिता पाणी आणण्यास  वर्धा नदी वर गेला. तो दररोज तिथे पाण्यात डुबकी लावून आंघोळ करायचा

मेंढला (जि. नागपूर) : नरखेड तालुक्यात मोवाड व अंबाडा ( सायवाडा ) येथील पोहण्यास गेलेल्या तीन अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून  करुण अंत झाला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

पहिली घटना मोवाड येथील आहे. अनिकेत केशव वाघे (वय १८) हा वर्धा नदी काठावरील महादेव मंदिरात दररोज पूजा करायला जायचा. सकाळी ७.३० वाजता दरम्यान तो महादेव मंदिरातील मूर्तींची पूजा करिता पाणी आणण्यास  वर्धा नदी वर गेला. तो दररोज तिथे पाण्यात डुबकी लावून आंघोळ करायचा परंतु घटनेच्या दिवशी त्याचा अंदाज चुकल्याने तो खोलगट डोहात घसरला व त्यातच त्याचा डुबून करून अंत झाला.

हेही वाचा- कोरोनाबाधितांच्या अंत्यसंस्कारात वापरलेले साहित्य उघड्यावर; वाढला धोका

दुसरी घटना तालुक्यातील अंबाडा( सायवाडा) येथे घडली. अंबाडा येथील गजानन लक्ष्मण चचाने (वय १३) व नुतेश (मोना) जगदीश घाटवडे (वय १४) .गावाला लागूनच वनविभागचे जंगल आहे . दोन्ही अल्पवयीन तिथे  गुरे चारण्यासाठी कुटुंबियांसोबत  जात होते.

त्या भागात तलाव असल्याची दोन्ही अल्पवयींनाना माहिती होती..सध्या शाळा बंद असल्यामुळे पोहण्यासाठी तिथे गेले सायंकाळ झाली तरी मुले घरी न आल्यामुळें कुटुंबियांसह गावकऱ्यांनी त्यांचा शोध घेतला असता त्यांची सायकल तालावशेजारी आढळली.

अरे व्वा... भारतीय श्वानांना मिळणार हक्काचे घर; पण कसे काय, वाचा सविस्तर

तलावात गाळ असल्यामुळे त्यामध्ये ते फसल्याचा अंदाज गावकऱ्यांनी केला. शोध घेतला असता दोन्ही मुलं तलावातील गाळात रुतून असल्याचे आढळले . त्यांचा मृतदेह रात्री ८ च्या दरम्यान बाहेर काढण्यात आला. दोन्ही प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यू ची नोंद केली असून पुढील तपास करीत आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 3 boys are no more due to drowning in Nagpur district