ब्रेकिंग: नागपूर जिल्ह्यातील उमरेडजवळ भीषण अपघात; टिप्पर-ऑटोच्या धडकेततिघांचा जागीच मृत्यू; तीन जण जखमी 

टीम ई सकाळ 
Sunday, 3 January 2021

सविस्तर वृत्त असे की उमरेडकडून गिरड मार्गाने जात असणाऱ्या टिप्परच्या (क्र.एमएच १५, जिव्ही७४६३) चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणाने चालवून विरुद्ध दिशेने येणाऱ्या ऑटोला (क्र.एमएच ४९, ए. आर.५०५२) जोरदार धडक दिली. ऑटोमध्ये असलेल्या सहा प्रवाशांपैकी तिघांचा मृत्यू झाला, तर तिघे जखमी आहेत. 

उमरेड (जि. नागपूर)  : गिरड येथे देवदर्शनावरून परत येत असलेल्या नागपूरच्या भाविकांच्या ऑटोला रविवारी (ता.३)सायंकाळी सातच्या सुमारास उमरेड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील धुरखेडा शिवारामध्ये देवाळकर पेट्रोल पंपजवळ टिप्परने जोरदार धडक झाली. यात ऑटोस्वार व दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले. जखमींना प्राथमिक उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात नेले असता एकाचा रस्त्यातच मृत्यू झाला. यातील तिघे जण जखमी आहेत.

सविस्तर वृत्त असे की उमरेडकडून गिरड मार्गाने जात असणाऱ्या टिप्परच्या (क्र.एमएच १५, जिव्ही७४६३) चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणाने चालवून विरुद्ध दिशेने येणाऱ्या ऑटोला (क्र.एमएच ४९, ए. आर.५०५२) जोरदार धडक दिली. ऑटोमध्ये असलेल्या सहा प्रवाशांपैकी तिघांचा मृत्यू झाला, तर तिघे जखमी आहेत. 

अधिक वाचा - पुणे- नागपूर शिवशाहीत आढळलं संशयास्पद पार्सल; चालकानं बॉक्स उघडताच सरकली पायाखालची जमीन

जखमींना उमरेडच्या ग्रामीण रुग्णालयात प्रथम उपचारासाठी नेले असता येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून नागपूर येथे ‘रेफर’ करण्यात आले आहे. ही घटना आज सायंकाळी सहा चाळीस वाजताच्या दरम्यान धुरखेडा शिवारामधील देवाळकर पेट्रोल पंपजवळ घडल्यामुळे अपघात होताच बघ्यांची खूप गर्दी झाली होती. 

या अपघातात ऑटोस्वार मोहम्मद साकिर शेख अब्दुल कादीर (वय४२), अब्दुल कदिर अब्दुल करीम (वय५५), जुबिया अलि ईमरान अली (वय२५) यांचा मृत्यू झाला. आसमिन शेख ताईर शेख (वय3३५), जोया शेख ताईर शेख(वय १२), जुनेरा अलि ईमरान अली(वय२) हे जखमी आहेत. हे सर्व शांतीनगर नागपूर येथील रहिवासी असून गिरड येथे दर्शनासाठी गेले असल्याची माहिती सुत्रांनी दिली. जखमींना नागपूर येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. टिप्पर चालकाला उमरेड पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. 

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 3 people are no more in accident in Nagpur District